AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी वजन कमी कर, मग..; ‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्रीचा संघर्ष, आता कास्टिंग डायरेक्टर स्पष्टच बोलली..

अभिनेत्री अंजली आनंद 'गुलाबी साडी'च्या हिंदी व्हर्जनमुळे तुफान चर्चेत आली. मात्र वजनामुळे इंडस्ट्रीत बराच संघर्ष करावा लागल्याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता. यावर आता कास्टिंग डायरेक्टरची पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आधी वजन कमी कर, मग..; 'गुलाबी साडी' फेम अभिनेत्रीचा संघर्ष, आता कास्टिंग डायरेक्टर स्पष्टच बोलली..
अंजली आनंदImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 30, 2026 | 12:25 PM
Share

बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या निवडीदरम्यान दिसणं, फिटनेस आणि वजन यांना किती महत्त्व दिलं जातं, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री अंजली आनंदने नुकतंच तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दल बोलताना कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मासोबतच्या एका जुन्या संवादाचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता शानू शर्माने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टद्वारे तिने अंजलीला टोला लगावल्याचं म्हटलं जात आहे. शानू शर्मा ही यशराज फिल्म्सची (YRF) कास्टिंग डायरेक्टर म्हणून ओळखली जाते. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत, ‘I hope the next big trend is talent’ (यापुढील मोठा ट्रेंड हा ‘टॅलेंट’ असावा अशी मी आशा करते) असं लिहिलं. अंजली आनंदने काही दिवसांपूर्वी कास्टिंगशी संबंधित अनुभव सांगितल्यानंतर ही पोस्ट समोर आल्याने सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. शानूने हा अंजलीलाच हा टोमणा मारल्याचं म्हटलं जात आहे.

या पोस्टवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या. भूमी पेडणेकर, शालिनी पासी आणि अंकिता लोखंडे यांनी पोस्टवर प्रतिक्रिया देत समर्थन दर्शवलं. अभिनेता शार्दुल पंडितनेही टॅलेंटच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. फराह खानच्या यूट्यूब चॅनेलवरील एका संवादात अंजलीने 2020 मधील तिच्या कठीण काळाची आठवण सांगितली. कोरोनाच्या काळात काम मिळत नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तिच्या बचतीचे पैसेही संपली होती आणि ती काही काळ एकटी भाड्याच्या घरात राहत होती. या परिस्थितीत अभिनय सोडून भारताबाहेर जाण्याचाही विचार मनात आल्याचं तिने सांगितलं.

शानू शर्माची पोस्ट-

याच काळात तिचा शानू शर्माशी संपर्क झाला. याआधी भूमिकांसाठी झालेल्या भेटींमध्ये शानूने तिला वजन कमी केल्यानंतर कामाबाबत विचार करू, असं सांगितल्याचं अंजलीने म्हटलं. मात्र, नंतर शानूनेच तिला करण जोहरच्या चित्रपटातील भूमिकेसाठी ऑडिशनची संधी दिली. ऑडिशननंतर अंजलीला करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिने रणवीर सिंहच्या बहिणीची, गायत्री ‘गोलू’ रंधावाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे अंजलीला मोठ्या पडद्यावर चांगली ओळख मिळाली.

शानू शर्मांच्या पोस्टनंतर टॅलेंट, शरीरयष्टी, ओळखी आणि बॉलिवूडमधील संधी यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काही कलाकारांनी ‘टॅलेंट’ला महत्त्व मिळावं, अशी भूमिका व्यक्त केली, तर काही प्रतिक्रियांमध्ये केवळ टॅलेंटच्या आधारे संधी मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

Follow Us
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?