VIDEO: पत्नी सोनाक्षीसोबत बाप्पाची आरती करताना दिसला झहीर इक्बाल, हे दृश्य पाहून लोकांची बोलतीच थांबली

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या विवाहाची भरपूर चर्चा रंगली होती. दोघांनी विवाह केल्याने अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केले होते. लग्नाला सोनाक्षीचा भाऊ नसल्याने नाराजी दिसून आली होती. त्यानंतर आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यावर लोकं भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.

VIDEO: पत्नी सोनाक्षीसोबत बाप्पाची आरती करताना दिसला झहीर इक्बाल, हे दृश्य पाहून लोकांची बोलतीच थांबली
| Updated on: Sep 08, 2024 | 9:02 PM

झहीर इक्बाल पत्नी सोनाक्षीसोबत गणपती बाप्पाची आरती करताना दिसला. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. या दोघांनी 23 जून रोजी विवाह केला होता. आजपर्यंत प्रत्येकाला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. कारण त्यांच्या लग्नावरून बरेच वाद झाले होते. काहीजण या लग्नावरुन त्यांना ट्रोल देखील करत होते. सोनाक्षीचा भाऊ देखील त्यांच्या लग्नाला उपस्थित नव्हता. त्यामुळे त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आजकाल, कधी ती झहीरसोबत तिचे सुट्टीतील फोटो शेअर करते तर कधी कौटुंबिक सहलींचे फोटो पोस्ट करते.

नुकताच सोनाक्षी सिन्हाने गणेश उत्सवानिमित्त एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाक्षी सिन्हा अतिशय सुंदर सूट परिधान करताना दिसत आहे. न्यूड मेकअपमधील अभिनेत्रीचा लूक पाहण्यासारखा आहे. सोनाक्षीसोबत झहीर इक्बाल देखील दिसला होता. त्याने दुहेरी रंगाचा कुर्ता पायजमाही घातला होता.

व्हिडिओमध्ये हे दोघेही एकत्र बाप्पाची पूजा करताना दिसत आहेत. हा सुंदर व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षीने कॅप्शनमध्ये लिहिले – प्रेमात आदर वाढतो, जेव्हा जोडपे एकमेकांच्या विश्वासाचा खऱ्या सामंजस्यात आदर करतात…लग्नानंतरचा आमचा पहिला गणपती. या व्हिडीओवर युजर्सच्या प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत, कमेंट करताना एका यूजरने लिहिले- काय छान गोष्ट आहे, तुम्ही मन जिंकले, तर दुसरा म्हणाला- आता कुठे गेले लव्ह जिहाद म्हणणारे?

Follow Us