Subodh Bhave: हा माझा शेवटचा पुरस्कार, यापुढे मी मालिकेत…सुबोध भावेच्या तडकाफडकी निर्णयानं सर्वच चकित, काय घडलं?
Subodh Bhave On Awrad: सुबोध भावेने झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात एक विधान केले. या विधानाची आता सर्वत्र चर्चा रंगलीये.

Subodh Bhave On ZEE Marathi Award: झी मराठी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा झी मराठीच्या सोहळ्यात वीन दोघांतली ही तुटेना मालिकेने सर्वाधिक पुरस्कार पटकावले. या पैकी एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार. समर राजवाडेची भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेला यंदाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. खरंतर हा पुरस्कार सुबोधने अनेकवेळा जिंकला आहे, हा पुरस्कार त्याच्यासाठी किंवी चाहत्यांसाठीही नवीन नाही. पण आता त्यानं पुरस्कार जिंकल्यानंतर एक विधान केले. या विधानानं सर्वाचे लक्ष वेधले आहे.
सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार मिळताच सुबोध भावेला आनंद तर झाला पण त्याने लगेचच एक विधान केले. सुबोधने झी मराठी वाहिनीला एक मोठी विनंती केली आणि सर्वांत महत्त्वाचा निर्णय अखेर जाहीर केला. पुरस्कार जिंकल्यानंतर सुबोध म्हणाला की, ” सगळ्यात आधी ‘वीन दोघांतील तुटेना’ मालिकेची संपूर्ण टीम, पडद्यावर काम करणारे माझे सहकलाकार, पडद्यामागची टीम या सर्वांना हा पुरस्कार मी समर्पित करतो, कारण हा तुमचा पुरस्कार आहे. झी मराठीचे मी मनापासून आभार मानतो, प्रेक्षकांनाही मनापासून धन्यवाद म्हणतो, मी मागील २५ वर्षे झी मराठीसोबत काम करतोय, या क्षेत्रात व्यावसायिक अभिनेता म्हणून पाऊल पडले ते सुरुवातीला अल्फा मराठीवर. पहिली मालिका व्यावसायिक अभिनेता म्हणून मी ‘गीत रामायण’ केली. आजवर मी झी मराठीवर एकूण १९ मालिका केल्या आहेत.”
सुबोध भावे म्हणाला की, “एक काळ असा होता जेव्हा वाहिनीवर आठ, साड आठ आणि नऊ या सगळ्या स्लॉटला माझ्या मालिका लागायच्या, पुरस्कारांपेक्षा मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे ते वाहिनीने माझ्यावर दाखवलेला विश्वास. नवीन होतो, कुणीही मला ओळखत नव्हते…तेव्हा मला माझ्या आयुष्यातील पहिली मालिका अल्फा मराठी वाहिनीवर मिळाली. एका अभिनेत्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे, एक उत्तम मालिका, एक उत्तम व्यकितरेखा साकारता येणे, आता पर्यंत मी १९ मालिका साकारल्या, त्यात १९ भूमिका, त्या सगळ्या भूमिका लोकांच्या स्मरणात राहिल्या. या प्रत्येक मालिकेसाठी, प्रत्येक भूमिकेसाठी माझा विचार केला गेला..यासाठी मी झीचे आभारर मानतो.”
“अर्थात ही माझी काही शेवटची मालिका नाहीये, पण मला इथून पुढेही आणखी मालिका करायच्या आहेत, पण माझी झी मराठीला आता एक विनंती आहे की, वैयक्तिक पुरस्कारासाठी माझा विचार करणं थांबवा, हा माझा शेवटचा वैयक्तिक पुरस्कार असेल, यापुढे मी मालिकेसाठी वैयक्तिक पुरस्कार घेणार नाही, याचं कारण म्हणजे माझ्यापेक्षाही छान काम करणारे सहकलकार इथे बसले आहेत, त्या नायकांची आता सुरुवात आहे तर त्यांना हा पुरस्कार मिळावा. त्यांना शाबसकी, पुरस्काराची जास्त गरज आहे.” असे सुबोध भावे म्हणाला.