AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FEATURED

धीरूभाई अंबानी यांची दूरदृष्टी ते मुकेश अंबानी यांच्या डिजिटल क्रांतीपर्यंत : रिलायन्सचा प्रेरणादायी प्रवास

आज रिलायन्सचे आपल्या गुंतवणूकदारांशी असलेले नाते ज्या विश्वासावर उभे आहे, त्याची पायाभरणी इतिहासातील याच महत्त्वपूर्ण क्षणी झाली. भारताच्या प्रगतीवर अंबानी कुटुंबाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष छाप उमटलेली आहे. आणि ही कहाणी अजूनही पुढे सुरूच आहे.

धीरूभाई अंबानी यांची दूरदृष्टी ते मुकेश अंबानी यांच्या डिजिटल क्रांतीपर्यंत : रिलायन्सचा प्रेरणादायी प्रवास
Dhirubhai Ambani - Reliance Industries
| Edited By: | Updated on: Oct 14, 2026 | 5:30 PM
Share

धीरूभाई अंबानी यांच्या दूरदर्शी विचारांपासून ते मुकेश अंबानी यांनी लाखो लोकांपर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याच्या ध्यासापर्यंत, रिलायन्सचा प्रवास हा भारताच्या औद्योगिक विकासाचा, सर्वसमावेशक प्रगतीचा आणि डिजिटल परिवर्तनाचा प्रेरणादायी आलेख आहे. खरे तर रिलायन्सची पायाभरणी दोन महत्त्वपूर्ण विचारांवर झाली आहे—मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस आणि ती स्वप्ने सर्वांची बनवण्याचा दृढ संकल्प. रिलायन्सचा वारसा या विश्वासावर उभा आहे की, एखादी कंपनी प्रगती करत असेल, तर तिच्यासोबत देशाने आणि देशातील नागरिकांनीही प्रगती केली पाहिजे. कंपनीचे सर्वांत मोठे यश केवळ स्वतःची भरभराट करण्यात नसून, लाखो भारतीयांना त्या यशाचे भागीदार होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात आहे, असा रिलायन्सचा विश्वास आहे.

रिलायन्सचा अनेक दशकांचा प्रवास हे दाखवून देतो की, मोठे विचार, दूरदर्शी नेतृत्व, दीर्घकालीन नियोजन आणि मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक यांच्या माध्यमातून व्यक्ती, कुटुंबे आणि संपूर्ण समुदायांसाठी नव्या संधी निर्माण करता येतात. पुढील पिढीही हाच विचार पुढे नेत असताना, रिलायन्सची कहाणी भारताच्या प्रगतीच्या आणि आशा-आकांक्षांच्या प्रवासाशी घट्ट जोडली गेली आहे.

धीरूभाई अंबानी : सामान्य भारतीयांमध्ये ‘इंडियन ड्रीम’चा विश्वास जागवणारे उद्योजक

धीरूभाई अंबानी हे असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी लाखो भारतीयांना ‘इंडियन ड्रीम’ अर्थात भारतीय स्वप्नावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली. देशाच्या प्रगतीमध्ये सामान्य भारतीयांचाही वाटा असला पाहिजे, या विचारावर त्यांचा ठाम विश्वास होता.

गुजरातमधील चोरवाड या छोट्याशा गावापासून आजच्या विशाल रिलायन्स समूहाची उभारणी करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी येमेनमध्ये पेट्रोल पंपावर काम करण्यापासून ते भारतात परत येणे, मुंबईत छोटासा व्यापार सुरू करणे आणि पुढे जगातील सर्वांत मोठ्या बहुअब्ज डॉलर व्यावसायिक साम्राज्यांपैकी एक उभारणे, हा त्यांचा प्रवास महत्त्वाकांक्षा, कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न, व्यावसायिक कौशल्य आणि भारतासह भारतीय जनतेवरील अढळ विश्वासाच्या बळावर साकार झाला.

पहिला आयपीओ : सामान्य भारतीय पहिल्यांदाच कंपनीचे भागधारक बनले

सामान्य भारतीयांवरील विश्वासामुळेच धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्सच्या विकासात सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होण्याची संधी दिली. १९७७ मध्ये रिलायन्सने आणलेल्या सार्वजनिक समभाग विक्रीने कंपनी आणि भारतीय गुंतवणूकदार यांच्यातील नात्याला एक नवे वळण दिले.

धीरूभाई अंबानी यांनी सामान्य कुटुंबांच्या आर्थिक स्वप्नांमध्ये समभागांची मालकी मिळवण्याची संकल्पना रुजवली. भारताच्या आर्थिक प्रगतीकडे केवळ प्रेक्षक म्हणून पाहण्याऐवजी त्यात सक्रिय भागीदार होण्यासाठी त्यांनी लोकांना प्रोत्साहित केले.

लाखो भारतीयांसाठी देशाच्या भविष्यामध्ये आर्थिक भागीदारी मिळवण्याची ही पहिलीच संधी होती. सुरुवातीच्या काळात रिलायन्सवर विश्वास ठेवून गुंतवणूक करणाऱ्या अनेकांचे छोटेसे भांडवल पुढे इतक्या मोठ्या संपत्तीत रूपांतरित झाले की, त्यांनी त्याची कधी कल्पनाही केली नव्हती. रिलायन्सच्या प्रगतीसोबत सामान्य कुटुंबांचीही आर्थिक भरभराट झाली.

धीरूभाई अंबानी यांच्यापूर्वी मोठी कंपनी उभारणे हे काही मोजक्या लोकांपुरतेच मर्यादित असल्याचे मानले जात होते. मात्र, गुजरातमधील एका छोट्याशा गावातील शाळाशिक्षकाचा मुलगाही विशाल व्यावसायिक साम्राज्य उभारू शकतो आणि सामान्य कुटुंबेही भागधारक बनून त्याच्या नफ्यात सहभागी होऊ शकतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.

वडिलांचे स्वप्न ते भारतातील सर्वांत मोठी रिफायनरी : प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली महत्त्वाकांक्षा

रिफायनरी उभारण्याचे धीरूभाई अंबानी यांचे स्वप्न मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली साकार झाले. त्यातूनच गुजरातमधील जामनगर रिफायनिंग कॉम्प्लेक्सचा विकास झाला. हा प्रकल्प रिलायन्सने पुढील काळात साध्य केलेल्या व्यापक औद्योगिक उद्दिष्टांचे प्रतीक आहे. दूरदृष्टी, मोठ्या प्रमाणावर काम करण्याची क्षमता आणि भारताच्या औद्योगिक सामर्थ्यात परिवर्तन घडवणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता या वैशिष्ट्यांचे दर्शन यातून घडते.

जिओ : मोबाइल ब्रॉडबँडच्या बाबती भारत आघाडीच्या देशात समाविष्ठ

देशातील सर्वांत मोठ्या रिफायनरीची उभारणी केल्यानंतर रिलायन्सने प्रत्येक भारतीयासाठी दळणवळण आणि संपर्कसेवा सुलभ आणि परवडणाऱ्या बनवण्याचे स्वप्न पाहिले. २०१६ मध्ये जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर व्हॉइस कॉल मोफत झाले आणि डेटाच्या किमती एका वडापावच्या किमतीइतक्या खाली आल्या. अवघ्या १७० दिवसांत १० कोटी भारतीय जिओशी जोडले गेले. म्हणजेच दर सेकंदाला सात जण या नेटवर्कशी जोडले जात होते. काही महिन्यांतच मोबाइल ब्रॉडबँडच्या बाबतीत १५५ व्या क्रमांकावर असलेला भारत जगातील आघाडीच्या देशांमध्ये पोहोचला.

‘जिओ’ या शब्दाचा अर्थ ‘जगा’ असा आहे. ही सेवा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही. जंगलांमध्ये, डोंगरांच्या शिखरांवर आणि आदिवासी वस्त्यांमध्येही ती पोहोचली—ज्या भागांत यापूर्वी कोणतेही नेटवर्क उपलब्ध नव्हते. आजही अनेक दुर्गम गावांमध्ये जिओ हेच आपल्या प्रियजनांशी संपर्क साधण्याचे एकमेव माध्यम आहे. आरोग्यविषयक आणीबाणीच्या प्रसंगी जीवन वाचवण्यासाठी मदत करणारे महत्त्वाचे साधन म्हणूनही ते उपयोगी पडते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जागतिक स्तरावरील संधींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ते उपलब्ध करून देते.

२०२० मध्ये महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले, तेव्हा वर्गखोल्या, कार्यालये आणि डॉक्टरांच्या सेवा डिजिटल नेटवर्कवर अवलंबून राहिल्या. मात्र, हे नेटवर्क खंबीरपणे कार्यरत राहिले. आजी-आजोबांना व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या नातवंडांचे चेहरे पाहता आले. मुले शिक्षण घेत राहिली आणि कुटुंबांचे उत्पन्न सुरू राहिले. जिओने भारताला एकमेकांशी जोडून ठेवले.

भारतासाठी उभारणी, जगाशी स्पर्धा

डिजिटल पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि पुढील पिढीच्या क्षमतांमध्ये रिलायन्सने केलेली गुंतवणूक भारतातून जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणारे उद्योग उभारण्याची महत्त्वाकांक्षा दर्शवते. औद्योगिक पायाभरणीपासून डिजिटल आणि तांत्रिक विकासापर्यंतचा रिलायन्सचा प्रवास हे दाखवून देतो की, भारतीय उद्योग देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक आकांक्षांच्या पूर्ततेमध्ये कशा प्रकारे योगदान देऊ शकतात.

अब्जावधी लोकांना जोडणे आणि व्यवसायाचा विस्तार करणे यासाठी केवळ पैशांची गरज नव्हती. त्यासाठी अनेक वर्षांचा संयम, एका विचारावर सर्वस्व पणाला लावण्याचे धाडस आणि इतरांना एखादी गोष्ट अशक्य वाटत असतानाही पुढे जात राहण्याचा दृढ निश्चय आवश्यक होता. मुकेश अंबानी यांच्याकडे हे तिन्ही गुण होते. त्यांचा हा दृढ संकल्प नसता, तर भारताची डिजिटल क्रांती कदाचित आजही प्राथमिक टप्प्यातच राहिली असती.

पिढ्यान्‌पिढ्या पुढे जाणारा वारसा

धीरूभाई अंबानी यांनी व्यवसायाची केलेली सुरुवात, मुकेश अंबानी यांनी केलेला व्यवसायाचा विस्तार आणि आता आकाश, ईशा व अनंत अंबानी तंत्रज्ञान, किरकोळ व्यापार आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रांत पुढे नेत असलेले काम—रिलायन्सची ही कहाणी सातत्य, स्थैर्य आणि काळानुसार नव्याने उभे राहण्याची क्षमता दर्शवते.

प्रत्येक पिढीला एक भक्कम पाया वारशाने मिळतो; मात्र, आपल्या काळातील भारतासाठी त्यापेक्षा काहीतरी अधिक मोठे निर्माण करण्याची अपेक्षाही तिच्याकडून केली जाते.

रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श

नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या उपक्रमांनी ५४ हजारांहून अधिक गावांमधील ६.६ कोटींपेक्षा जास्त लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. आज जिओ १२ भारतीय भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) मोफत अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे. पुढील तंत्रज्ञान क्रांतीचा लाभ केवळ काही मुलांनाच नव्हे, तर प्रत्येक मुलाला मिळावा, हा त्यामागील उद्देश आहे.

रिलायन्सचा वारसा : दररोज नवा इतिहास घडवण्याची परंपरा

रिलायन्सची कहाणी ही मूलतः उद्योगविश्व आणि राष्ट्रीय आकांक्षा यांच्यातील बदलत्या नात्याची कहाणी आहे. रिलायन्सचा भूतकाळ महत्त्वाकांक्षा आणि संपत्तीनिर्मितीची गाथा सांगतो. वर्तमान भारताच्या औद्योगिक आणि डिजिटल परिवर्तनाचा व्यापक आवाका दर्शवतो, तर भविष्य उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवे व्यवसाय आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांमधून निर्माण होणाऱ्या संधींवर आधारलेले आहे.

रिलायन्सचा वारसा केवळ कंपनीने उभारलेल्या उद्योगांपुरता मर्यादित नाही. भारतीयांना केवळ स्वप्ने पाहण्याचीच नव्हे, तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात साकार करण्याची क्षमता देणे, हेही त्या वारशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

जगात फारच कमी कुटुंबांनी आपल्या देशाच्या जडणघडणीवर अंबानी कुटुंबाप्रमाणे प्रभाव टाकला आहे. गुजरातमधील एका छोट्याशा खोलीपासून ते देशभर पसरलेल्या नेटवर्कपर्यंतचा हा प्रवास प्रत्येक पिढीने स्वतःपेक्षाही मोठे काहीतरी निर्माण करून ते पुढील पिढीकडे सुपूर्द केल्याची कहाणी आहे. भारताच्या प्रगतीवर अंबानी कुटुंबाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अमीट छाप उमटलेली आहे आणि ही कहाणी अजूनही पुढे सुरूच आहे.

Disclaimer: हा एक Sponsored लेख आहे. यात दिलेली माहिती आणि दावे जाहिरात देणाऱ्या कंपनीचे आहेत. TV9Marathi.com या लेखातील माहिती आणि दाव्यांना जबाबदार नाही. कोणत्याही माहितीचा वापर करण्यापूर्वी तुम्ही स्वत: त्याची खात्री करून घ्या.
Follow Us
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?