AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

99 टक्के लोक गणपती बाप्पाची आरती म्हणताना या शब्दांचा करतात चुकीचा उच्चार, तुम्ही देखील..

गणपती बाप्पाची आरती म्हणताना 99 टक्के लोक या शब्दांचे करतात चुकीचा उच्चार. आजही अनेकजण हेच शब्द बोलतात. जाणून घ्या योग्य शब्द उच्चार.

99 टक्के लोक गणपती बाप्पाची आरती म्हणताना या शब्दांचा करतात चुकीचा उच्चार, तुम्ही देखील..
ganpati aarti Image Credit source: Social media
| Updated on: Sep 15, 2026 | 4:21 PM
Share

गणेशोत्सव म्हटलं की घराघरात बाप्पाची आरती, पूजा आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं. गणपती बाप्पाची आरती म्हणताना प्रत्येकाच्या मनात श्रद्धा आणि भक्तिभाव असतो. मात्र, आरती म्हणताना काही शब्दांचा चुकीचा उच्चार किंवा चुकीचे शब्द बोलले जातात. अनेकदा हे शब्द इतक्या वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने म्हटले जात असल्याने आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. त्यामुळे बाप्पाची आरती म्हणताना नेमके कोणते शब्द योग्य आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

‘सुखकर्ता दुःखहर्ता’ आरती म्हणताना या चुका टाळा

गणपतीची आरती म्हटलं की सर्वात आधी आठवते ती म्हणजे ‘सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची’. या आरतीतील काही शब्दही अनेकांकडून चुकीच्या पद्धतीने म्हटले जातात.

चुकीचा उच्चार : नुरवी पुरवी प्रेम कृपा देवाची, कृपा जयाची अचूक ओळ : नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची

तसंच,

चुकीचा शब्द : रत्नखचित करा नव्हे अचूक शब्द : रत्नखचित फरा

आरतीमध्ये पुढे,

चुकीचा शब्द : ओटी शेंदुराची अचूक शब्द : उटी शेंदुराची अशी ओळ येते.

‘वक्रतुंड त्रिनयना’ की ‘वक्रतुंडत्रिनयना’?

आरती म्हणताना आणखी एक महत्त्वाची चूक अनेकदा ऐकायला मिळते.

चुकीचा उच्चार : वक्रतुंड त्रिनयना अचूक उच्चार : वक्रतुंडत्रिनयना

तसंच, आरतीच्या शेवटीही काही जण शब्द चुकवतात.

चुकीची ओळ : दास रामाचा वाट पाहे सजणा अचूक ओळ : दास रामाचा वाट पाहे सदना

तसेच,

चुकीचा शब्द : फळीवर वंदना अचूक शब्द : फणिवरबंधना

आणि,

चुकीचा शब्द : संकष्टी पावावे अचूक शब्द : संकटी पावावे

अशा प्रकारे आरतीतील शब्दांचा योग्य उच्चार केल्यास तिचा अर्थ आणि भाव अधिक स्पष्टपणे समजतो.

इतर आरती म्हणतानाही होतात शब्दांच्या चुका

फक्त गणपतीची आरतीच नाही, तर इतर देवांच्या आरती म्हणतानाही अनेकदा शब्दांचा चुकीचा उच्चार केला जातो. त्यामुळे काही लोकप्रिय आरतींमधील योग्य शब्द जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

‘लवलवती विक्राळा’ नव्हे, तर ‘लवथवती विक्राळा’

आरती म्हणताना अनेक जण ‘लवलवती विक्राळा’ असा उच्चार करतात. मात्र योग्य शब्द ‘लवथवती विक्राळा’ असा आहे.

तसंच,

चुकीची ओळ : ओवाळू आरत्या सुरवंटया येती अचूक ओळ : ओवाळू आरत्या कुरवंड्या येती

त्यामुळे यंदा बाप्पाची आरती म्हणताना वरील शब्दांकडे नक्की लक्ष द्या आणि चुकीच्या पद्धतीने प्रचलित झालेले शब्द टाळा.

Follow Us
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी