नसीरुद्दीन शाहांसाठी आशुतोष राणा मैदानात!

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी देशातील सध्याच्या वातावरणासंबंधी केलेल्या एका विधानानंतर एकच गदारोळ झाला. त्यांच्या विधानाचा विपर्यास करुन, विशिष्ट विचारधारेच्या समर्थकांनी नसीरुद्दीन शाहांविरोधात सोशल मीडियावरुन विरोध सुरु केला आणि एकच टीका सुरु केली. त्यावरुन मोठी चर्चा गेल्या दोन-तीन दिवसात सुरु असताना, आता नसीरुद्दीन शाह यांच्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी एकवटताना दिसत आहेत. काय म्हणले […]

नसीरुद्दीन शाहांसाठी आशुतोष राणा मैदानात!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी देशातील सध्याच्या वातावरणासंबंधी केलेल्या एका विधानानंतर एकच गदारोळ झाला. त्यांच्या विधानाचा विपर्यास करुन, विशिष्ट विचारधारेच्या समर्थकांनी नसीरुद्दीन शाहांविरोधात सोशल मीडियावरुन विरोध सुरु केला आणि एकच टीका सुरु केली. त्यावरुन मोठी चर्चा गेल्या दोन-तीन दिवसात सुरु असताना, आता नसीरुद्दीन शाह यांच्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी एकवटताना दिसत आहेत.

काय म्हणले होते नसीरुद्दीन शाह?

“समाजात विष पसरलंय. माझ्या मुलाच्या सुरक्षेची चिंता वाटते. कायदा हातात घेण्याची खुली सूट मिळाली आहे. मला धर्माचं शिक्षण मिळालं होतं. पण तिला (पत्नी) धर्माचं शिक्षण मिळालेलं नाही. कारण, ती लिबरल कुटुंबातून आहे. मी माझ्या मुलांना धर्माविषयी शिकवलं नाही. चांगलं आणि वाईट याचा धर्माशी संबंध नाही. पण मुलांची चिंता वाटते, की त्यांना कधी जमावाने घेरलं आणि विचारलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम? तर त्यांच्याकडे काहीही उत्तर नसेल”, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.

वाचा : नसीरुद्दीन शाह ‘सरफरोश’मधील ‘गुल्फाम हुसेन’, भाजपचं टीकास्त्र

“कुठल्याही भीतीविना सगळ्यांना आपलं मत आपल्या मित्रांशी किंवा कुणाही लोकांशी व्यक्त करण्याचा अधिकार असायला हवा. मात्र, असे कुणी व्यक्त केल्यावर आपण फारच तातडीने व्यक्त होतो. जर कुणी असे (नसीरुद्दीन यांनी जसे वक्तव्य केले.) वक्तव्य केले, तर ते केवळ ऐकायला नको, तर त्यावर विचार करायला हवा.”, असे मत अभिनेते आशुतोष राणा यांनी व्यक्त केले.

मधुर भंडारकर काय म्हणाले?

“प्रत्येकाला बोलण्याच अधिकार आहे. आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. इथे काही भीती आहे, असे मला वाटत नाही. देशात प्रत्येकजण स्वतंत्र आहे, समान आहे. आणि आपल्या येथे प्रत्येकजण मत व्यक्त करु शकतं, ही आपली खासियत आहे. त्यामुळे आपल्या येथे असहिष्णुता आहे, असे मला वाटत नाही.” असे सिनेदिग्दर्शक मधुर भंडारकर म्हणाले.

अजून किती स्वातंत्र्य पाहिजे? : अनुपम खेर

देशात एवढं स्वातंत्र आहे, की सैन्याविषयी अपशब्द वापरले जातात. एअर चीफविषयी वाईट बोललं जातं आणि सैनिकांवर दगडफेक केली जाते. तुम्हाला या देशात अजून किती स्वातंत्र्य हवंय? असा तिखट सवाल अनुपम खेर यांनी नसीरुद्दीन शाह यांना केला.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.