मला माझ्या मुलांची चिंता वाटते : नसीरुद्दीन शाह

मुंबई : जमावाकडून होणाऱ्या हिंसाचारावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवापेक्षा गायीच्या हत्येला जास्त महत्त्व दिलं जातंय, असं ते म्हणाले. शिवाय आजच्या या समाजाता माझ्या मुलांचीही चिंता वाटते, असं त्यांनी सांगितलं. समाजात विष पसरलंय. माझ्या मुलाच्या सुरक्षेची चिंता वाटते. कायदा हातात घेण्याची खुली सूट मिळाली आहे. मला धर्माचं शिक्षण […]

मला माझ्या मुलांची चिंता वाटते : नसीरुद्दीन शाह
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : जमावाकडून होणाऱ्या हिंसाचारावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवापेक्षा गायीच्या हत्येला जास्त महत्त्व दिलं जातंय, असं ते म्हणाले. शिवाय आजच्या या समाजाता माझ्या मुलांचीही चिंता वाटते, असं त्यांनी सांगितलं.

समाजात विष पसरलंय. माझ्या मुलाच्या सुरक्षेची चिंता वाटते. कायदा हातात घेण्याची खुली सूट मिळाली आहे. मला धर्माचं शिक्षण मिळालं होतं. पण तिला (पत्नी) धर्माचं शिक्षण मिळालेलं नाही. कारण, ती लिबरल कुटुंबातून आहे. मी माझ्या मुलांना धर्माविषयी शिकवलं नाही. चांगलं आणि वाईट याचा धर्माशी संबंध नाही. पण मुलांची चिंता वाटते, की त्यांना कधी जमावाने घेरलं आणि विचारलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम? तर त्यांच्याकडे काहीही उत्तर नसेल, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले. वाचा ‘विराट हा उद्धट खेळाडू’ – नसरुद्दीन शाह

परिस्थिती लवकर सुधारणार नसल्याचं पाहून आणखी चिंता वाटते, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले. या गोष्टींची भीती वाटत नाही, तर चिड येते. हा राग प्रत्येक चांगला विचार करणाऱ्या व्यक्तीला यायला हवा. हे आपलं घर आहे, इथून कोण आपल्याला हाकलू शकतो?, असा सवालही शाह यांनी केला.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये 3 डिसेंबरमध्ये गोहत्येच्या अफवेवरुन हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात पोलीस अधिकाऱ्याचाही गोळी लागून मृत्यू झाला. या पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूवर बोलताना शाह यांनी त्यांची सद्यपरिस्थितीबाबतची चिंता व्यक्त केली आणि कायदा हातात घेण्याची सूट मिळाली असल्याचं सांगितलं.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.