'विराट हा उद्धट खेळाडू' - नसरुद्दीन शाह

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने क्रिकेट विश्वातील अनेक बड्या खेळाडूंना टक्कर दिली, अनेक किताब आपल्या नावे केले. आपल्या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय संघाचा कर्णधार बनला. ही जबाबदारी त्याने मोठ्या शिताफीने पार पाडली. मात्र धोनीसारखा तो ‘कुल कॅप्टन’ होऊ शकला नाही. कोहली हा किती आक्रमक खेळाडू आहे हे …

'विराट हा उद्धट खेळाडू' - नसरुद्दीन शाह

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने क्रिकेट विश्वातील अनेक बड्या खेळाडूंना टक्कर दिली, अनेक किताब आपल्या नावे केले. आपल्या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय संघाचा कर्णधार बनला. ही जबाबदारी त्याने मोठ्या शिताफीने पार पाडली. मात्र धोनीसारखा तो ‘कुल कॅप्टन’ होऊ शकला नाही. कोहली हा किती आक्रमक खेळाडू आहे हे तर आपण तो खेळत असताना बघतोच, पण मैदानाबाहेरही तो तितकाच आक्रमक असल्याचं दिसून आलं आहे.

काही दिवसांपूर्वी विराटचा एक व्हिडीओ समोर आला होता, हा एक प्रमोशनल व्हिडीओ होता. या व्हिडीओत एक फॅनने कमेंट केली होती की, सध्याच्या भारतीय खेळांडूंच्या तुलनेत त्याला ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश खेळाडू जास्त आवडतात. यावर त्या फॅनला विराट म्हणाला की, तुम्ही भारत सोडायला हवे.

विराटच्या या वक्तव्यामुळे त्याला ट्रोलही करण्यात आले होते. यावर विराटने स्पष्टीकरण दिले होते की, ट्रोलिंग माझ्यासाठी नाही. मी स्वत: ट्रोलिंगला एंजॉय करतो आणि मी तर केवळ त्या व्यक्तीच्या कमेंटमधील ‘हे भारतीय’ यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता.


त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी विराटच्या वागणुकीवर कमेंट केली आहे. यात नसरुद्दीन शाह यांनी विराटला जगातील सर्वात वाईट वागणूक करणारा खेळाडू म्हटले आहे.

नसरुद्दीन शाह यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली,

“विराट कोहली हा जगातील सर्वात चांगला फलंदाजच नाही तर तो जगातील सर्वात जास्त वाईट वागणारा खेळाडू आहे. त्याच्यातील अहंपणा आणि वाईट वागणुकीसमोर त्याचे क्रिकेटमधील यश कमी पडते… आणि माझा देश सोडण्याचा कुठलाही विचार नाही.”

नसरुद्दीन शाह यांच्या या पोस्टवर विराट फॅन्स खूप नाराज झाले आणि त्यांनी नसरुद्दीन शाह यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. विराट फॅन्सने नसरुद्दीन शाह यांच्यावर टीकास्त्र सोडले, तर काहींनी नसरुद्दीन शाह यांच्या समर्थनार्थ कमेंट केल्या.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *