बीएमसीच्या मदतीसाठी अक्षय कुमार धावला, मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी 3 कोटींची मदत

पीएम केअर्स फंडमध्ये 25 कोटी दिल्यानंतर आता अक्षय कुमारने बीएमसीला 3 कोटीची मदत केली आहे.

बीएमसीच्या मदतीसाठी अक्षय कुमार धावला, मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी 3 कोटींची मदत

मुंबई : कोरोना विषाणूला संपूर्ण जग तोंड (Corona Virus) देत आहे. देशातही कोरोनाने (Akshay Kumar Help BMC) थैमान माजवलं आहे. या विषाणूला लढा देण्यासाठी सरकार, राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या लढाईत बॉलिवूड कलाकारांनीही वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने पीएम केअर्स फंडमध्ये 25 कोटी रुपयांची मदत केली. त्यानंतर खिलाडी कुमारने मुंबई महानगप पालिकेलाही मदत (Akshay Kumar Help BMC) देऊ केली आहे. त्याने बीएमसीला 3 कोटी रुपयांची मदत केली आहे.

मास्क आणि कोरोना टेस्टिंग किट्ससाठी मदत 

कोरोना विषाणूला हरवण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. अशा कठीण प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटीही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती पसरवण्याचं काम करत आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही करत आहेत. पीएम केअर्स फंडमध्ये 25 कोटी दिल्यानंतर आता अक्षय कुमारने बीएमसीला 3 कोटीची मदत केली आहे. रिपोर्सनुसार अक्षयने ही मदत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित मास्क मिळावा आणि टेस्टिंग किट्ससाठी केली आहे (Akshay Kumar Help BMC).

रिपोर्ट्सनुसार, बीएमसीकडे पीपीई मास्कची कमतरता असल्याची माहिती अक्षय कुमारला मिळाली. त्यानंतर त्.ाने ही मदत केली.

शाहरुख खान कडूनही मदत 

अभिनेता शाहरुख खाननेही बीएमसीला त्याची 4 मजली ऑफीसची इमारत क्वारंटाईन सेंटर बनवण्यासाठी ऑफर केली आहे. तसेच, शाहरुखने अनेक ठिकाणी आर्थिक मदत करुन कोरोनाग्रस्तांची मदत केली आहे.

सलमान खानकडून स्पॉट बॉय ते फिल्म लाईन कामगारांना मदत 

अभिनेता सलमान खाननेही या कठीण काळात चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या  16,000 कामगारांच्या बँक खात्यात 4 कोटी 80 लाख रुपये जमा केले आहे.

Akshay Kumar Help BMC

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *