बीडमध्ये शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

शेतीच्या वादातून दहा ते बारा जणांनी हल्ला करुन तिघांची हत्या केल्याचा आरोप आहे. (Beed Kej Triple Murder)

बीडमध्ये शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

बीड : शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. 12 जणांच्या टोळक्याला तिघांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केज तालुक्यात काल (बुधवारी) रात्री ही घटना घडली. (Beed Kej Triple Murder)

शेतीच्या वादातून दहा ते बारा जणांनी हल्ला करुन तिघांची हत्या केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी तीन बाईकसह जीवनावश्यक वस्तू जाळल्या. युसूफ वडगावमध्ये ही घटना घडली.

70 वर्षीय वृद्ध, त्याची दोन मुलं यांची हत्या झाली, तर सून गंभीर जखमी आहे. संबंधित कुटुंब शेतीच्या वादामुळे 2006 पासून अंबाजोगाईत राहत होते. मात्र काल हे कुटुंब गावात आल्याची माहिती मिळताच दहा ते बारा जणांनी तलवार, लोखंडी गज याने त्यांच्यावर हल्ला केला.

हेही वाचा : नागपुरात चिमुरडीच्या डोळ्यादेखत आईची हत्या, बापाला अटक

तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तर जखमी महिलेला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. (Beed Kej Triple Murder)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *