नागपुरात चिमुरडीच्या डोळ्यादेखत आईची हत्या, बापाला अटक

नागपुरात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. मंगळवारी (12 मे) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

नागपुरात चिमुरडीच्या डोळ्यादेखत आईची हत्या, बापाला अटक

नागपूर : नागपुरात घरगुती वादातून पतीने (Nagpur Crime Husband Killed Wife) पत्नीची हत्या केल्याची थरारक घटना घडली. नागपुरातील नंदनवन परिसरातील हिवरी नगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे ही घटना घडत असताना त्यांची चार वर्षांची मुलगी तिथेच होती. या चिमुरडीच्या डोळ्यादेखत तिच्याच बापाने तिच्या (Nagpur Crime Husband Killed Wife) आईची हत्या केली.

लॉकडाऊनमुळे सगळे घरी आहेत. यातच घरगुती वादातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागपुरात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. मंगळवारी (12 मे) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पती विलास भुजाडे याने पत्नी श्रुती भुजाडेवर स्वयंपाक घरातील चाकूने वार करत तिची हत्या केली.

श्रुती भुजाडे आणि विलास भुजाडे यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. विलास श्रुतीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. सोमवारी रात्री या दोघांमधील वाद चांगलाच विकोपाला गेला. भाडणांच्या आवाजाने त्यांची चार वर्षांची मुलगी जागी झाली. जेव्हा पती विलासने श्रुतीवर वार केले तेव्हा ही चिमुकली ते सर्व आपल्या डोळ्यांनी बघत होती. त्यानंतर तिने तिच्या काकाला याबाबतची माहिती दिली. मात्र, तोपर्यंत श्रुतीचा जीव गेला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं आणि पती विलासला अटक केली.

याप्रकरणी पती विलासवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Nagpur Crime Husband Killed Wife).

संबंधित बातम्या :

पोलिसांसोबत नाकाबंदीची ड्युटी, अंगावर ट्रक घालून चालकाने शिक्षकाला चिरडले

साताऱ्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

PSI पतीच्या बंदुकीतून गोळीबार, पोलीस पत्नीची आत्महत्या

Lockdown | जालन्यात अवैध दारुवर धडक कारवाई, विदेशी दारुचा मोठा साठा जप्त

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *