राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा

लक्ष्मीकांत घोणसे पाटील, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्यावर शुक्रवारी रात्री खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटे पंचक्रोशीत गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाण्यामुळे वाद चालू होता. या दूषित पाण्यामुळे गावकरी त्रस्त आहेत. नागरिकांनी याबद्दलची तक्रार आमदार […]

राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

लक्ष्मीकांत घोणसे पाटील, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्यावर शुक्रवारी रात्री खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोटे पंचक्रोशीत गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाण्यामुळे वाद चालू होता. या दूषित पाण्यामुळे गावकरी त्रस्त आहेत. नागरिकांनी याबद्दलची तक्रार आमदार संजय कदम यांच्याकडे केली. त्यानंतर आमदार कदम यांनी लोटे प्रदूषण नियंत्रण मंडळाला भेट दिली. दरम्यान अधिकाऱ्यांसोबत बोलत असताना झालेल्या बाचा-बाचीतून आमदार संजय कदम यांनी तेथील अधिकाऱ्याला मारहाण केली.

या मारहाणीप्रकरणी आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्यांच्या सहकाऱ्यांवरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संजय कदम हे रत्नागिरीतील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांचा निसटता पराभव केला होता.

1990 पासून दापोली विधानसभेवर शिवसेनेची मजबूत पकड होती. 1990 पासून तेथे सेनेचे सूर्यकांत दळवी हे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होते.

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.