AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योगी आदित्यनाथ दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात, त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं : अनिल देशमुख

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात, त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं, असा सणसणीत टोला हाथरस प्रकरणावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावलाय. (Home Minister Anil Deshmukh Slam Yogi Adityanath over Hathras Rape Case)

योगी आदित्यनाथ दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात, त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं : अनिल देशमुख
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Sep 30, 2020 | 11:01 PM
Share

मुंबई “योगी आदित्यनाथ बाकी राज्याच्या लोकांना मार्गदर्शन करत असतात. आज त्यांच्याच राज्यामध्ये जंगलराज आहे. त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं”, असा सणसणीत टोला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हाथरस प्रकरणावरून योगींना लगावला आहे. (Home Minister Anil Deshmukh Slam Yogi Adityanath over Hathras Rape Case)

“पीडित मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिची जीभ कापण्यात आली , तसंच तिच्या पाठीचा कणा देखील त्यांनी मोडला. 10 दिवस तिचे कुटुंबीय एफआयआर देण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांचा एफआयआर देखील घेतला गेला नाही. योगी आदित्यनाथ बाकी राज्याच्या लोकांना मार्गदर्शन करत असतात आज त्यांच्या राज्यामध्ये जंगलराज आहेत. त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं”, असा निशाणा गृहमंत्र्यांनी योगींवर साधला.

“सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांचा अतिशय योग्य तपास सुरू असताना एकाएकी तो तपास सीबीआयकडे देण्यात आला. सीबीआयच्या चौकशीकडे आमचं लक्ष आहे. सुशांत सिंह राजपूतचा खून झालाय की त्याने आत्महत्याच केली, याचा खुलासा सीबीआयने लवकरात लवकर केला पाहिजे”, असं गृहमंत्री देशमुख म्हणाले.

“गेली 2 महिने ज्या पद्धतीने सुशांत प्रकरणावरून राजकारण झालं त्यावरून महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं काम एका पक्षाने केलं”, असं म्हणत त्यांनी भाजपचं नाव न घेता निशाणा साधला. तसंच बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन खालच्या दर्जाचं राजकारण एका पक्षाने केलं, असा आरोप करत त्याचा मी निषेध करतो, असं अनिल देशमुख म्हणाले.

हाथरस बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करत, बोलता येऊ नये म्हणून तिची जीभदेखील कापून टाकली. दिल्लीतील सफदरजंग रुगणालयात पीडितेवर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी (29 सप्टेंबर) उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा

पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणून, उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) गुपचूप या मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला आहे. विनवणी करूनही पोलिसांनी मुलीचे अंत्यदर्शन करू न दिल्याने, कुटुंबियांनी आक्रोश केला.

(Home Minister Anil Deshmukh Slam Yogi Adityanath over Hathras Rape Case)

संबंधित बातम्या

Hathras Case | योगीजी, उत्तर प्रदेशात आपल्याला रामराज्य आणायचंय की गुंडाराज?; रुपाली चाकणकर भडकल्या

उत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

Hathras Gang-Rape | पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा, लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आक्रोश

नटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा निशाणा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या