नटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा निशाणा

देशातील एकेकाळी लढणारी खंबीर अनुसूचित जमातीतील चळवळ आज निस्तेज होताना दिसत आहे.(Sanjay Raut On Hathras Uttar Pradesh Gang raped Case)

नटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा निशाणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील बलात्काराच्या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. “उत्तरप्रदेशात घडलेली ही घटना दुर्देवी आणि धक्कादायक आहे. तिच्याविषयी मला कुठेही ट्विटरवर किंवा मीडियात आंदोलन छेडलेलं दिसत नाही. रिपाईचे नेते रामदास आठवले कुठे आहेत, एखाद्या अभिनेत्रीच्या घरी जाऊन तिला सुरक्षा देतात, मात्र अनुसूचित जमातीतील एका मुलीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी काहीही बोलत नाही,” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. (Sanjay Raut On Hathras Uttar Pradesh Gang raped Case)

“उत्तरप्रदेशातील ही घटना दुर्देवी आणि धक्कादायक आहे. उत्तरप्रदेशाला रामराज्य म्हटलं जातं. त्या ठिकाणी राम मंदिराची उभारणी होतं आहे. दिल्लीपासून काही अंतरावर असणाऱ्या हाथरससारख्या ठिकाणी एका मुलीवर बलात्कार होतो. तिची हत्या होते. याप्रकरणी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. जर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या ठिकाणी अशी एकदा घटना घडली. जर कोणत्या अभिनेत्रीच्या घराची कौल जरी उडवली तरी सुद्धा अन्याय, अत्याचार असं म्हटलं जातं. त्याप्रकरणी आवाज उठवला जातो. मग आता का नाही,” असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

“एखाद्या गरीब मुलीला न्याय मिळू नये का? त्यासाठी एखादी अभिनेत्री किंवा एखादा सेलिब्रेटी हवा का? हाथरसमधील ती निर्भया आमची कोणी लागत नाही का?” असेही सवाल संजय राऊतांनी विचारले. (Sanjay Raut On Hathras Uttar Pradesh Gang raped Case)

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्याऐवजी युपीबाबत ती मागणी करावी” 

“हाथरस बलात्कार घटनेप्रकरणी मला कुठेही ट्वीटवर किंवा मीडियात आंदोलन छेडलेलं दिसत नाही. रामदास आठवले कुठे आहेत. अभिनेत्रीच्या घरी जाऊन तिला सुरक्षा देत होते, त्यांचे कार्यकर्ते स्वागतासाठी गेले होते. काल राजभवनात गेले होते. या देशातील एकेकाळी लढणारी खंबीर अनुसूचित जमातीतील चळवळ आज निस्तेज होताना दिसत आहे.”

“अनुसूचित जमातीतील मुलीवर अत्याचार होतात आणि कोणीही लढत नाही. काहीही बोलत नाही. आम्ही शांतपणे याकडे पाहतोय. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आवाज उठवू. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांनी आता युपीबाबत ती मागणी करावी,” असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

“बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणी हाच निर्णय अपेक्षित होता” 

बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणाचा निकाल गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला होता. 28 वर्षांपूर्वी बाबरी विद्धवंसचा जो निर्णय आला आहे, मी त्या निकालाचे स्वागत करतो. महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या निकालाचे स्वागत करतात. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांसह इतर सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

ही घटना पूर्वनियोजित नव्हती, ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, त्यामुळे ही घटना घडली, असे न्यायलयाने स्पष्ट केले. हाच निर्णय अपेक्षित होता. आपण त्या घटनेला विसरलाय हवं. आता अयोध्येत राम मंदिर बनलं पाहिजे. जर बाबरीचा विद्धवंस झाला नसता, तर आज राम मंदिराचे जे भूमीपूजन झाले तो दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता. मी त्यावर जास्त काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणाचा निकालाबाबत दिली. (Sanjay Raut On Hathras Uttar Pradesh Gang raped Case)

संबंधित बातम्या : 

Babri Case | बाबरी विद्ध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त

UP GANGRAPE CASE | स्मृती इराणी गप्प का? नेटकऱ्यांची इराणींवर टीकेची झोड, राजीनामा देण्याची मागणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI