Hathras Case | योगीजी, उत्तर प्रदेशात आपल्याला रामराज्य आणायचंय की गुंडाराज?; रुपाली चाकणकर भडकल्या

योगीजी, उत्तर प्रदेशात आपल्याला रामराज्य आणायचंय की गुंडाराज?; असा सवाल राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे. (NCP Rupali Chakankar Attacked Cm Yogi Adityanath Over Hathras Case)

Hathras Case | योगीजी, उत्तर प्रदेशात आपल्याला रामराज्य आणायचंय की गुंडाराज?; रुपाली चाकणकर भडकल्या
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 4:23 PM

मुंबईउत्तर प्रदेशातल्या हाथरस बलात्कार (Hathras Rape Case) प्रकरणावरून संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. अशातच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशात रामराज्य आणायचंय की गुंडाराज?, असा सवाल केला आहे. (NCP Rupali Chakankar Attacked Cm Yogi Adityanath Over Hathras Case)

“योगी सरकारने त्यांच्या जाहिरातबाजीमध्ये जी कायदा सुव्यवस्था दाखवली होती, ज्या रामराज्याची स्वप्न नागरिकांना दाखवली होती मात्र हाथरस प्रकरणानंतर असं म्हणावं लागेल की त्या नागरिकांची स्वप्न धुळीला मिळाली आहेत. योगी सरकारने उत्तर प्रदेशातील नागरिकांची दिशाभूल केलीये. मुळात योगींकडे चांगली कायदा सुव्यवस्थाच अस्तित्वात नाहीये”, असा हल्लाबोल चाकणकर यांनी योगींवर केला आहे.

“उत्तर प्रदेशातील मुली, महिला तसंच सामान्य नागरिक भयभीत आणि असुरक्षित आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात ज्या घटना घडतायेत, सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्या प्रकारची गुंडगिरी सुरु आहे, त्यावरून आम्हाला असा प्रश्न पडतो की योगीजी, उत्तर प्रदेशात आपल्याला रामराज्य आणायचंय की गुंडाराज?”, असा सवाल चाकणकर यांनी विचारला.

हाथरस प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि स्मृती इराणी यांच्या मौनावर देखील चाकणकरांनी निशाणा साधला. “मोदी-शहा-स्मृती इराणी आपण हाथरस प्रकरणावर साधा ब्र देखील उच्चारला नाही. म्हणजे यावरून हे स्पष्ट होतंय की आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना पीडितेला न्याय द्यायचा नाही तर आपल्याला कंगनाला न्याय द्यायचाय”, असं चाकणकर म्हणाल्या.

“पीडितेचा मृतदेह परस्पर जाळण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला कुणी दिले”, असा सवाल करत या प्रकरणाची खोलवर चौकशी झाली पाहिजे, असं चाकणकर म्हणाल्या.

“हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या लवकरात लवकर मुसक्या आवळल्या जाव्यात तसंच त्यांना फाशीची शिक्षा दिली जावी”, अशी मागणी त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीने केली. (NCP Rupali Chakankar Attacked Cm Yogi Adityanath Over Hathras Case)

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1216762248696732&id=177300259309608

हाथरस बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करत, बोलता येऊ नये म्हणून तिची जीभदेखील कापून टाकली. दिल्लीतील सफदरजंग रुगणालयात पीडितेवर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी (29 सप्टेंबर) उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा

पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणून, उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) गुपचूप या मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला आहे. विनवणी करूनही पोलिसांनी मुलीचे अंत्यदर्शन करू न दिल्याने, कुटुंबियांनी आक्रोश केला.

(NCP Rupali Chakankar Attacked Cm Yogi Adityanath Over Hathras Case)

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

Hathras Gang-Rape | पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा, लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आक्रोश

नटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा निशाणा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.