इंदोरीकरांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात कार्यक्रम, अंनिसचा आक्रमक पवित्रा

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात (Indorikar Maharaj Shivaji University) कार्यक्रम होत आहे.

इंदोरीकरांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात कार्यक्रम, अंनिसचा आक्रमक पवित्रा
Follow us
| Updated on: Feb 28, 2020 | 10:48 AM

कोल्हापूर : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात (Indorikar Maharaj Shivaji University) कार्यक्रम होत आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर पुरोगामी संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचा विद्यापीठात कार्यक्रम नको, अशी आक्रमक भूमिका कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी घेतली आहे. (Indorikar Maharaj Shivaji University)

शिवाजी विद्यापीठात 4 वाजता इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम आहे. मात्र त्याआधी आज अंनिसचे कार्यकर्ते विद्यापीठात जाऊन जाब विचारणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरात इंदोरीकर महाराज यांच्या एण्ट्रीआधी चांगलंच वातावरण तापल्याची चर्चा आहे. इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनादरम्यान सम-विषम तारखांवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ

अहमदनगरला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीस देण्यात आली आहे. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्य केल्याने, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंनिसच्या समन्वय अड रंजना गावांदे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बाबपुसाहेब गाडे यांच्याकडे नोटीस दिली. विशेष म्हणजे पंधरा दिवसात गुन्हे दाखल करा अन्यथा तुम्हला स आरोपी केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज

काही दिवसांपूर्वी महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी किंवा मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. माभ सायबरसेलने तो व्हिडीओ यूट्यूबवर नसल्याचं PCPNDT समितीला सांगितलं होतं. त्यामुळे कुठेतरी त्यांना दिलासा मिळत असल्याचं वाटत होतं. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुरावे सादर करुन इंदोरीकरांची अडचण वाढवली.

पीसीपीएनडीटी कायद्यातील तरतूद काय आहे?

पीसीपीएनडीटी कायद्यातील कलम 22 नुसार गर्भलिंग निदान निवडीबाबत जाहिरात करण्यास बंदी आहे. छापील पत्रक, संवाद, मेसेज, फोन किंवा इंटरनेटद्वारे गर्भलिंग निदान आणि निवडीची जाहिरात करण्यास बंदी आहे. कलम 22, कलम 22 (3) चा भंग झाल्यास संबंधित दोषींना 3 वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयांच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे.

इंदोरीकरांचं वादग्रस्त विधान

इंदुरीकर महाराजांनी आपल्या एका किर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत इंदुरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.”

इंदोरीकरांकडून दिलगिरी

सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी (Indorikar Maharaj apologize) व्यक्त केली आहे. “समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. 26 वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन , समाजसंग्रह , अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी”, असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

माझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो : इंदुरीकर महाराज  

राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा 

आमचं घरच बसल्यासारखं झालं, मुलं शाळेत जाईनात, आख्खं घर आऊट झालं, इंदुरीकर महाराज उद्विग्न  

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.