AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचं घरच बसल्यासारखं झालं, मुलं शाळेत जाईनात, आख्खं घर आऊट झालं, इंदुरीकर महाराज उद्विग्न

इंदुरीकर महाराज अत्यंत उद्विग्न असल्याचं दिसतंय. कारण काल बीडमध्ये आणि आज अहमदनगरमध्ये झालेल्या कीर्तन सोहळ्यात, इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj controversy) आता कीर्तन बास, शेती करु असं म्हटलं.

आमचं घरच बसल्यासारखं झालं, मुलं शाळेत जाईनात, आख्खं घर आऊट झालं, इंदुरीकर महाराज उद्विग्न
| Updated on: Feb 15, 2020 | 3:58 PM
Share

अहमदनगर : समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj controversy) अडचणीत सापडले आहेत. या वादानंतर इंदुरीकर महाराज अत्यंत उद्विग्न असल्याचं दिसतंय. कारण काल बीडमध्ये आणि आज अहमदनगरमध्ये झालेल्या कीर्तन सोहळ्यात, इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj controversy) आता कीर्तन बास, शेती करु असं म्हटलं.

अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार इथे आज इंदुरीकरांचं कीर्तन झालं. या कार्यक्रमासाठी आलेल्या इंदुरीकर महाराजांभोवती बाऊन्सर्सचं कडे होतं. तसंच कीर्तनाचं मोबाईल व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यास मनाई होती.

यावेळी इंदुरीकर महाराज म्हणाले, “ 26 वर्ष मी कीर्तन केलं. महिलांना मी तुमच्या मुलासारखाच असं म्हणालो. तरी माला एवढा त्रास होतोय,आपली  कपॅसिटी संपली. आमचं घरच बसल्यासारखं झालं. 5 दिवस झालं माझा मुलगा आणि मुलगी शाळेत जात नाही. घर आऊटच झालंय”

तुम्ही मला 26 वर्ष झाले पाहात आला. आता पक्कं डोक्यात आलंय, आता दोन-तीन दिवस कीर्तन करायचं आणि पुढं कार्यक्रमच करायचे नाही, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

दुसरा माणूस मेलाच असता हो या अठवड्यात, घेणं नाही अन् देणं नाही. मी जे बोललो ते खरं आहे. गुरुचरीत्र खरं आहे. भागवत खरं आहे, ज्ञानेश्वरी खरी आहे, त्यात चुकीचं काहीच नाही, असं म्हणत इंदुरीकरांनी सम-विषय तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं अप्रत्यक्ष म्हटलं.

याशिवाय अमरावतीत मुलींना प्रेमविवाह न करण्याबाबत दिलेल्या शपथेवरही इंदुरीकरांनी भाष्य केलं. “पेपरला एक बातमी होती की मुलींनी प्रेम विवाह न करण्याची शपथ घेतली. मात्र प्रेमविवाह करायचा नाही अशी शपथ घेऊ नका तर योग्य प्रियकर निवडणे अशी शपथ घ्या”, असा सल्ला इंदुरीकरांनी दिला.

परळीतील कीर्तनात यूट्यूबवाल्यांवर खापर

दरम्यान, इंदुरीकर महाराजांचं काल बीड जिल्ह्यातील परळी इथं कीर्तन झालं. यावेळी त्यांनी यूट्यूब चॅनल्सवर खापर फोडलं. यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. आज इंदुरीकर संपवायला निघालेत. पण मी बोलतोय हे खरंच आहे. मी कशात सापडेना म्हणून मला गुतवण्याचा(अडकवण्याचा) प्रयत्न सुरु आहे. मी तर आता या मुद्द्यावर आलो आहे की, एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा, आता लय झालं, फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कपॅसिटी संपली, असं इंदुरीकर म्हणाले.

संबंधित बातम्या  

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज

पुत्रप्राप्तीसंदर्भात ‘ऑड-इव्हन’चं वक्तव्य भोवलं, पीसीपीएनडी नोटीससोबतच इंदुरीकरांचं कीर्तनही रद्द 

आखाडा : सम-विषम तारखेवर लिंग कसं ठरतं? लोकांना हसवणारे इंदुरीकर महाराज अडचणीत

इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.