गणेश नाईकांना कोरोना व्हायरसचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करा : जितेंद्र आव्हाड

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या गणेश नाईकांवर टीकेची झोड उठवली.

गणेश नाईकांना कोरोना व्हायरसचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करा : जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Mar 07, 2020 | 11:12 PM

नवी मुंबई :गणेश नाईकांना कोरोना व्हायरसचे (Jitendra Awhad Criticise Ganesh Naik) ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करा’, असं म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या गणेश नाईकांवर टीकेची झोड उठवली. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे आज राष्ट्रवादीचा युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मंचावर उपस्थित होते.

यावेळी जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांवर (Jitendra Awhad Criticise Ganesh Naik) निशाणा साधला. “2014 ला पराभव झाला आणि साहेब खुर्चीवरुन पडले. ब्रीच कॅण्डिला उपचार सुरु होते आणि हेच नाईक ‘मी काही आता बोलत नाही, पवार साहेबांना सर्व माहिती’, असं बोलतात. “अरे जे बाळासाहेबांचे झाले नाही, ते काय पवारांचे होणार”, असं म्हणत आव्हाडांनी गणेश नाईकांवर टीका केली.

हेही वाचा : नवी मुंबईत आता त्यांची ताकद राहिली नाही, रोहित पवारांचा गणेश नाईकांना टोला

“कोण होते गणेश नाईक, हे विश्वास ठेवून आम्ही बघितले. मी पाच वर्षांपूर्वी बोललो होतो हे जाणार. दादाच्या मनात किती पाप होते, हे आम्हाला माहिती आहे. ते ठाण्यामध्येही नगरसेवकांचे कान चावत होते. पण, ठाणे महापालिका आम्ही शाबूत ठेवली”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अशा गद्दारांना मी विचारत नाही : जितेंद्र आव्हाड

“काय केले या नाईकांनी. जे झाले ते काँग्रेसच्या माध्यमातून झाले. आता दिवस संपले. माझे देखील आयुष्य यांनी खराब केलं, माझे कुटुंब देखील खराब केलं, शरद पवार यांना सांगितले आम्ही जाणार नाही आणि भाजपात गेले. अशा गद्दारांना मी विचारत नाही. संजीव नाईक यांना मी विचारत नाही”, असं म्हणत आव्हाडांनी नाईक पिता-पुत्रांवर ताशेरे ओढले.

“इमारतींचे आणि इतर कंत्राट कोणाकडे. खंडणी आणि धमकी या नवी मुंबईत कोणाचे चालते या गणेश नाईक यांचे. एवढीच श्रीमंती असेल तर जागा गरिबांना कधी देणार”, असं म्हणत आव्हाडांनी गणेश नाईकांवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

“शरद पवारांनी गणेश नाईक यांना सर्वकाही दिले, तरी सुद्धा पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसले.”

“फोन उचलत नाही, असा लोकनेता. मी सदैव फोन उचलतो. एकजण पुढे येऊन सांगा की कधी नाईक यांनी नवी मुंबईत लोकांचे फोन उचलले. चौघुले हा माझा मित्र होता. पण, काय करणार संजीव नाईक यांना मी मदत केली. मेहनतीने उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष नाईक यांनी संपवला”, असंही आव्हाड म्हणाले.

“काही लोकांचे नाशीब आहे, ते शिवसेनेकडे गेले आणि त्यानंतर पवारांकडे आले. सत्तेसाठी काय काय करायचे हे नाईकांना माहित आहे. गणेश नाईक कोणीही नाही, ते स्वतःचे खिशे भरण्यासाठी लढले. मंदा म्हात्रे यांना नाराज केले. गणेश नाईकमुळे ते पक्ष सोडून गेले. गणेश नाईकमुळे विजय चौघुले यांचे देखील तिकीट कापले.”

गणेश नाईक इथे पोहोचले ते पवार आणि आई-वडिलांमुळे : जितेंद्र आव्हाड

“एक वेळी मुघलांची सलतनत संपेल, पण गणेश नाईक यांची नाही. मी प्रत्येक दिवस आता नाईक यांच्या बिषयी बोलणार. माझी खाट पाडणारे हे गणेश नाईक, तरी सुद्धा मी ठाणे कायम ठेवले. मी यांच्याकडून कधीही पैसे घेतले नाही. परंतु त्यांच्या प्रचारात मी करोडो पैसे खर्च केले. त्याचे उत्तर द्यावे. कमीत कमी, माझे अस्तित्व संपवणारे हे गणेश नाईक आतापर्यंत इथे पोहोचले ते पवार आणि आई-वडिलांमुळे. 30 वर्षांपासून राजकारणात असलेल्या या रावणाला भस्मासूर करायला आलो. आता आरे ला कारेने उत्तर देणार”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तसेच, “कळवा मुंब्रामध्ये विकास बघा, माझा आमदारकीचा वॉर्ड बघा, हे ओपन चॅलेंज आहे, नाहीतर नावाचा जितेंद्र आव्हाड नाही. आता अटॅक म्हणजे अटॅक. शत्रू कितीही मोठा असेल तरी चालेल. पण, महाविकास आघाडीचे नवी मुंबईच्या विकासाचे ( Jitendra Awhad Criticise Ganesh Naik) स्वप्न पूर्ण करेन”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

संबंधित बातम्या :

कोरोना इफेक्ट : हात मिळवण्यास आलेल्या व्यक्तीसमोर शरद पवारांनी हात जोडले

कोण काय बोलतं, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही : अजित पवार

आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही, राम मंदिरासाठी 1 कोटी, अयोध्येत उद्धव ठाकरेंची घोषणा

दादा, पुढचे कार्यक्रम अकरानंतर घेत जा, आव्हाडांच्या मागणीवर अजित पवारांचे चिमटे

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.