Corona Live Update : संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास केलेले 8 जण कोरोनाबाधित

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

Corona Live Update : संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास केलेले 8 जण कोरोनाबाधित
Picture

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढली

मुंबईहून ट्रेनने जबलपूरला प्रवास केलेल्या चौघांना कोरोनाची लागण, तर संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास केलेले 8 जण कोरोनाबाधित

21/03/2020,1:48PM
Picture

मुंबई मेट्रोचा जनता कर्फ्यूमध्ये सहभाग

BREAKING – मुंबई मेट्रोचा जनता कर्फ्यूमध्ये सहभाग, रविवार 22 मार्चला घाटकोपर- वर्सोवा मेट्रो सेवा बंद @MumMetro #JantaCurfew

21/03/2020,1:05PM
Picture

औरंगाबादेत कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी दवंडी

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी दवंडी, गावागावात दवंडीच्या माध्यमातून सूचना, घराबाहेर न पडण्यासाठी दवंडी देऊन आवाहन, करोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी पारंपरिक माध्यमांचा वापर

21/03/2020,11:07AM
Picture

कोरोनाची खबरदारी! रवीना टंडनने स्वत: रेल्वेची बर्थ पुसली

21/03/2020,1:08PM
Picture

21 आणि 22 मार्चला उस्मानाबाद जिल्हा शट डाऊन

उस्मानाबाद : 21 आणि 22 मार्चला उस्मानाबाद जिल्हा शट डाऊन, जिल्ह्यातील सर्व दुकाने संस्था बंद, कोरोना उपाययोजना म्हणून उचलले पाऊल, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांचे आदेश

21/03/2020,11:04AM
Picture

अज्ञान, मस्ती की आगाऊपणा, हातावर 'क्वारंटाईन'चे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, दोघांना विरारमध्ये उतरवलं

21/03/2020,1:09PM
Picture

पुणे बंगळुरु आशियायी महामार्गावरील वाहतूक मंदावली

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाळण्यात येत असलेल्या बंदचा परिणाम पुणे-बंगळुरु आशियायी महामार्गावर दिसून येत आहे, आज सकाळपासून या महामार्गावरील वाहतूक घटली, परराज्यातून येणाऱ्या वाहनांमध्ये कमतरता, माल वाहतूक करणारी वाहनेही कमी

21/03/2020,11:02AM
Picture

कल्याणमध्ये रिक्षा बंद असताना काही रिक्षा चालकांची मनमानी सुरु

21/03/2020,10:27AM
Picture

औरंगाबाद शहरातील सर्वात मोठे कापड मार्केट कडकडीत बंद

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सर्वात मोठे कापड मार्केट कडकडीत बंद, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला, साथीच्या रोगामुळे कडकडीत बंद पाळण्याची इतिहासातली ही पहिलीच वेळ, गुलमंडी आणि पैठण गेट परिसरातील सर्वच दुकाने कडकडीत बंद

21/03/2020,10:23AM
Picture

नागपुरात लॉक डाऊननंतर सर्वत्र दुकानं बंद

नागपूर : नागपुरात लॉक डाऊननंतर सकाळी सर्वत्र दुकानं बंद, नागरिकांचा प्रतिसाद, नागपुरातील सीताबर्डी मार्केट पूर्णतः बंद, सकाळपासूनच पोलिसांकडून नागरिकांना बाहेर न निघण्याच आवाहन, पोलीस फिरुन फिरुन करत आहेत आवाहन

21/03/2020,10:17AM
Picture

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस सांगली बंद

सांगली : तीन दिवस सांगली बंद, रविवार, सोमवार आणि मंगळवार हे तीन दिवस सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने, व्यवसाय आणि व्यवहार बंद, आयुक्त, व्यापारी, उद्योजक यांच्या बैठकीत निर्णय, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाय

21/03/2020,10:19AM
Picture

नांदेडमध्ये 31 मार्चपर्यंत दारुविक्री बंद

नांदेड : 31 मार्चपर्यंत दारुविक्री बंद, जिल्ह्यात आजपासून 31 मार्चपर्यंत सर्व प्रकारची दारुविक्री बंद, तसेच 21 ते 23 मार्च दरम्यान सर्व बाजारपेठ बंद, जिल्हाधिकारी यांचे आदेश, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मोठा निर्णय

21/03/2020,10:20AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *