Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,487 रुग्णांची भर, कोरोनाबाधितांची संख्या 67,655 वर

राज्यात सध्या 36 हजार 031 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आज 89 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,487 रुग्णांची भर, कोरोनाबाधितांची संख्या 67,655 वर

मुंबई : राज्यात आज 2 हजार 487 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली (Maharashtra COVID-19 Cases) आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 67 हजार 655 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 89 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच, दिवसभरात 1 हजार 248 जण कोरोनामुक्त (Maharashtra COVID-19 Cases) झाले आहेत.

राज्यात सध्या 36 हजार 031 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आज 89 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 2,286 इतकी झाली आहे.

आज झालेल्या 89 मृत्यूपैकी कुठे किती मृत्यू?

  • मुंबईचे – 52
  • नवी मुंबई – 9
  • ठाणे – 5
  • कल्याण-डोंबिवली – 4
  • मालेगाव – 6
  • जळगाव – 3
  • सोलापूरचे – 2
  • पुणे – 9
  • उस्मानाबाद – 1
  • यवतमाळ – 1

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 39 हजार 686 वर

मुंबईत दिवसभरात 1,244 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 39 हजार 686 वर पोहोचली आहे. आज मुंबईत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 1 हजार 279 वर पोहोचली आहे.

राज्यातील रुग्ण दुपटीचा वेग 17 दिवसांवर

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.7 दिवस होता, तो आता 17.5 दिवस झाला आहे. तर देशाचा रुग्ण दुपटीचा वेग 15.7 दिवस इतका झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 43.35 टक्क्यांवर गेले आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.37 टक्क्यांवर आला आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. सध्या राज्यात 5 लाख 58 हजार 100 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 34 हजार 480 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत .

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई84524558844899
पुणे (शहर+ग्रामीण)2814213406872
ठाणे (शहर+ग्रामीण)47935181561270
पालघर 74702965126
रायगड58402741106
रत्नागिरी71247127
सिंधुदुर्ग2461725
सातारा133776948
सांगली43025111
नाशिक (शहर +ग्रामीण)52162935225
अहमदनगर (शहर+ग्रामीण)58035715
धुळे124870462
जळगाव 42362420278
नंदूरबार 197839
सोलापूर32141692296
कोल्हापूर 92073212
औरंगाबाद65682788294
जालना71938024
हिंगोली 2942501
परभणी128834
लातूर 42522922
उस्मानाबाद 26418612
बीड142953
नांदेड 39424214
अकोला 1662119986
अमरावती 69045130
यवतमाळ 33823511
बुलडाणा 31816913
वाशिम 120823
नागपूर1719129615
वर्धा 17131
भंडारा91770
गोंदिया 1671042
चंद्रपूर110630
गडचिरोली73601
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)113025
एकूण2,06,6191,11,7408,822

Maharashtra COVID-19 Cases

संबंधित बातम्या :

Lockdown 5.0 : महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती, मात्र या 9 गोष्टींवरील बंदी कायम

Maharashtra Mission Begin Again | तीन टप्प्यात शिथिलता येणार, कोणत्या टप्प्यात काय सुरु?

Maharashtra Lockdown Guideline | महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन 5 ची नियमावली, शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळ बंदच राहणार

Solapur Corona | सोलापुरात 891 कोरोनाबाधित, मृत्यूदर 9.42 टक्क्यांवर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *