RAIN LIVE : पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

मुंबईसह राज्यभरातील पावसाचे अपडेट एका क्लिकवर

Mumbai rain live, RAIN LIVE : पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

मुंबई : मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने (Heavy rain) अक्षरश: थैमान घातले आहे. गणेश चतुर्थीपासून सुरु झालेल्या पावसाने राज्यभरात चांगलाच जोर धरला आहे. येत्या 24 तासात मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाद्वारे देण्यात आला आहे. तर कल्याण, डोंबिवली, ठाणे या ठिकाणी रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे.

LIVE UPDATE

Mumbai rain live, RAIN LIVE : पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

पालघरमध्ये तिन्ही रिंजड कुटुंबियांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. गोठणपूर येथे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे तीन घरांचे मोठे नुकसान झाले. एक घर पूर्णपणे खाली कोसळले असून दोन घरांवर झाड पडले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून एक वृद्ध महिला जखमी झाली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरु आहे.

08/09/2019,1:45PM
Mumbai rain live, RAIN LIVE : पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

सिंधुदुर्ग येथे रस्त्यावर पाणी, करुळ घाट वाहतुकीसाठी बंद

सिंधुदुर्ग येथील मांडकुली येथे रस्त्यावर पाणी आल्याने करुळ घाट वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहे. परतीच्या प्रवासाला लागलेले चाकरमानी पर्यायी फोंडा घाट मार्गे वाहतूक करत आहेत. त्यामुळे फोंडाघाट येते वाहतूक कोंडी झाली आहे.

08/09/2019,12:33PM
Mumbai rain live, RAIN LIVE : पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

कृष्णा नदीच्या पुरात महिला वाहून गेली

कृष्णा नदीच्या पुरात महिला वाहून गेली आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील ही घटना घडली. पाय घसरल्याने ही महिला नदीत वाहून गेली. शोभा बाळाप्पा सुतार असं मृत महिलेचं नाव आहे.

08/09/2019,11:38AM
Mumbai rain live, RAIN LIVE : पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

गडचिरोलीत विजेच्या धक्क्याने 25 जनावरांचा मृत्यू

गडचिरोलीतील अहेरी तालुक्यात देवलमरी गावात पुराच्या पाण्यात विजेचा धक्का लागल्याने तब्बल 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून देवालमरी-अहेरी नाल्यात पुराचं पाणी आहे. या पाण्यात जनावरे गेल्याने त्यांना विजेचा धक्का लागला. गावकरऱ्यांना महिती मिळताच विघुत सेवा खंडित करण्यात आली.

08/09/2019,11:23AM
Mumbai rain live, RAIN LIVE : पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

मावळ वेधशाळेकडून अतिवृष्टीचा इशारा

मावळ वेधशाळेकडून पुढील 72 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वळवण धरणामधून विसर्ग 384 क्युसेस 580 क्यूसेक सोडण्यात आला आहे. अतिवृष्टी झाल्यास धरणातून विसर्गात वाढ करण्यात येईल, जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाणी येण्याची शक्यता

08/09/2019,11:13AM
Mumbai rain live, RAIN LIVE : पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

कोल्हापुरातील 66 बंधारे पाण्याखाली

कोल्हापुरातील पंचगंगा नदी 38.5 फुटांवरुन वाहत असून इशारा पातळी ओलांडण्यासाठी अवघे पाच इंच पाणी कमी आहे. नद्यांची पाणीपातळी वाढल्याने जिल्ह्यातील चार राज्यमार्ग व 15 जिल्हा मार्ग बंद आहेत. तर 66 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत.

08/09/2019,10:33AM
Mumbai rain live, RAIN LIVE : पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

कोल्हापुरात राधानगरी धरणातील दोन दरवाजे बंद

कोल्हापूर जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम, रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पहाटे राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले, त्यातून 11 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू, सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने दोन दरवाजे बंद, यामुळे नदीकाठच्या गावांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी पुराचा धोका अद्याप कायम,

08/09/2019,10:32AM
Mumbai rain live, RAIN LIVE : पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

वसईत सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले

वसई, विरार, नालासोपारा शहरात रात्रभर पावसाची रिपरिप, सखल भागात पाणी साचले, गेल्या 12 तासात वसई तालुक्यात 126 मिमी पावसाची नोंद, तर आतापर्यंत 3366 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

08/09/2019,10:28AM
Mumbai rain live, RAIN LIVE : पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

लालबाग राजाच्या मंडपात पाणी शिरले

मुसळधार पावसामुळे लालबाग राजाच्या मंडपात पाणी शिरले.

08/09/2019,10:25AM
Mumbai rain live, RAIN LIVE : पालघरमध्ये वादळी वारा, घरांचे मोठे नुकसान

मुंबईत पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात

गेल्या आठवडाभरापासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.

08/09/2019,10:24AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *