नाशिकमध्ये 24 तासात 61 नवे कोरोना रुग्ण, येवल्यात पुन्हा शिरकाव

कोरोनामुक्त झालेल्या येवल्यात पुन्हा 2 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. (Nashik Corona Patients Update)

नाशिकमध्ये 24 तासात 61 नवे कोरोना रुग्ण, येवल्यात पुन्हा शिरकाव

नाशिक : नाशिक जिल्ह्यात ‘कोरोना’चा कहर कायम आहे. गेल्या 24 तासात तब्बल 61 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 963 वर गेला आहे. कोरोनामुक्त येवल्यात पुन्हा व्हायरसचा शिरकाव झाला आहे. (Nashik Corona Patients Update)

मालेगाव, सिन्नर आणि घोटीमध्ये नवीन रुग्ण सापडले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या येवल्यात पुन्हा 2 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजाराच्या दिशेने वाटचाल करत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 963 वर गेला आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 51 झाली आहे.

मालेगावमधील 45 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. नाशिक शहरातील चार, तर जिल्ह्याबाहेरील रावळगाव आणि अहमदनगरच्या प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

मालेगावमध्ये आतापर्यंत 718 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर सध्या 243 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मालेगावमध्ये काल रात्री प्राप्त झालेल्या 116 रिपोर्टमध्ये फक्त एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

(Nashik Corona Patients Update)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *