Live Update : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार, दिवसभरात 3041 नवे रुग्ण

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार, दिवसभरात 3041 नवे रुग्ण
Picture

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारवर

24/05/2020,7:17PM
Picture

लॉकडाऊन अचानक उठवता येणार नाही, आता 'लॉकडाऊन' शब्द वापरु नका, हळूहळू आयुष्याची गाडी मार्गावर आणू

24/05/2020,2:13PM
Picture

शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न, 75 ते 80 टक्के कापूस खरेदी

24/05/2020,2:09PM
Picture

पुढच्या 15 दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं

24/05/2020,2:04PM
Picture

तीन लाख 80 हजार जणांना एसटीने आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं, 75 कोटी रुपये खर्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

24/05/2020,2:00PM
Picture

राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी 481 ट्रेन सोडल्या

24/05/2020,1:57PM
Picture

महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के जणांना मदत

24/05/2020,1:55PM
Picture

अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं, सर्ववर्गासाठी मदत : मुख्यमंत्री

24/05/2020,1:53PM
Picture

मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेचे चांगले सहकार्य

24/05/2020,1:52PM
Picture

बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, गोरेगाव येथे फिल्ड हॉस्पिटल सुरु

24/05/2020,1:51PM
Picture

सर्दी खोकला ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणेही, ती अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा

24/05/2020,1:49PM
Picture

पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा

24/05/2020,1:47PM
Picture

पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा, इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

24/05/2020,1:45PM
Picture

मे अखेरपर्यंत 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध असतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

24/05/2020,1:43PM
Picture

महाराष्ट्रात आजपर्यंत 1577 जणांचा कोरोनाने मृत्यू

24/05/2020,1:42PM
Picture

मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील

24/05/2020,1:40PM
Picture

मार्च-एप्रिलपासून कोरोना संकंट सुरु झालं. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली

24/05/2020,1:38PM
Picture

गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण वाढले

24/05/2020,1:37PM
Picture

सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले, मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच, ईदही कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येत घरी प्रार्थना करुन साजरी करा, असे आवाहन करतो

24/05/2020,1:35PM
Picture

नागपूर शहरात सीआरपीएफची तुकडी तैनात

नागपूर शहरात सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या 84 जवानांची तुकडी हॉटस्पॉट असलेल्या परिसरात तैनात केली आहे. गड्डीगोदाम, मोमीनपुरा, सातरंजीपुरा या हॉटस्पॉट झोनमध्ये पोलिसांच्या मदतीला जवान लावण्यात आले आहेत. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

24/05/2020,11:08AM
Picture

शिर्डीत विमानाने येणाऱ्यांना क्वारंटाईन करणार

शिर्डीत विमानाने येणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. दहा दिवसांसाठी सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. दहा दिवसांच्या क्वारंटाईननंतर पुन्हा सात दिवस होम क्वारंटाईन करण्यात येणार. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. उद्यापासून शिर्डी-हैद्राबाद विमानसेवा सुरु होणार आहे.

24/05/2020,10:56AM
Picture

औरंगाबाद जिल्ह्यात 28 कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात 28 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1276 कोरोना रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

24/05/2020,10:50AM
Picture

जालन्यात आणखी सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

जालन्यात आणखी सहा जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 60 झाली आहे. इतर रुग्णांच्या संपर्कात आल्याने या सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली.

24/05/2020,10:34AM
Picture

पुण्यातील कोरोना टेस्टिंगची सुविधा आणखी वाढणार

पुण्यातील कोरोना टेस्टिंगची सुविधा आणखी वाढणार आहे. ससून रुग्णालयात नव्या मशिन्स खरेदी केल्या जाणार आहेत. राज्य सरकार आणि महापालिका मिळून निधी खर्च करणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

24/05/2020,10:23AM
Picture

36 जिल्हे 72 बातम्या

24/05/2020,10:17AM
Picture

टॉप 9 न्यूज

24/05/2020,10:16AM
Picture

रत्नागिरीत कोरोनाबाधितांचा आकडा 145 वर

24/05/2020,10:15AM
Picture

मुंबईसह महाराष्ट्रात विमानसेवा बंदच

24/05/2020,10:15AM
Picture

विमानतळं सुरु करणं अत्यंत धोकादायक : गृहमंत्री अनिल देशमुख

24/05/2020,10:14AM
Picture

मुंबईसह महाराष्ट्राचे कोरोना अपडेट्स

24/05/2020,10:13AM
Picture

चंद्रपुरात फूड पॅकेट मिळवण्यासाठी प्रवाशांमध्ये हाणामारी

चंद्रपूर येथे फूड पॅकेट मिळवण्यासाठी प्रवाशांमध्ये हाणामारी झाली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर घडली. मंगलोर-लखनऊ श्रमिक स्पेशल ट्रेमधील ही घटना आहे. 72 प्रवाशांसाठी या स्टेशनवर जेवण वाटप करण्यात आले होते. रेल्वेत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होत त्यामुळे हाणामारी झाली. मंगलोरमधून पोलीस पैसे घेऊन जास्त प्रवासी चढवतात, अशा आरोप केला जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो, असाही आरोप प्रवाशांनी केला.

24/05/2020,10:10AM
Picture

पुण्यातील ढोले पाटील रोड परिसरात सर्वाधिक कोरोना रुग्ण

पुण्यातील ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय परिसरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या आहे. भवानी पेठेतील परिस्थितीत सुधारणा झाल्येच दिसत आहे. भवानी पेठ परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ढोले पाटील रोड परिसरात 464 तर भवानी पेठ परिसरात 223 कोरोना रुग्ण आहेत. त्यासोबत ढोले पाटील रोड परिसरात 331 तर भवानी पेठ परिसरात 388 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

24/05/2020,9:51AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

24/05/2020,9:46AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *