नीरव मोदीला पुढच्या पाच दिवसात अटक होणार?

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा सूत्रधार पळपुटा हिरा व्यापारी नीरव मोदीला 25 मार्चपर्यंत अटक केली जाऊ शकते. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांना लंडनकडून याबाबतची माहिती मिळाली आहे. ईडीचे अधिकारी लंडनमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आता लवकरच मोदीला अटक होण्याची शक्यता आहे. विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणानंतर भारतीय संस्थांना लंडनच्या कायदेशीर प्रक्रियेचा अंदाज आला आहे. याचा फायदा नीरव […]

नीरव मोदीला पुढच्या पाच दिवसात अटक होणार?
युके हायकोर्टाकडून नीरव मोदीला मोठा झटका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा सूत्रधार पळपुटा हिरा व्यापारी नीरव मोदीला 25 मार्चपर्यंत अटक केली जाऊ शकते. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांना लंडनकडून याबाबतची माहिती मिळाली आहे. ईडीचे अधिकारी लंडनमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आता लवकरच मोदीला अटक होण्याची शक्यता आहे.

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणानंतर भारतीय संस्थांना लंडनच्या कायदेशीर प्रक्रियेचा अंदाज आला आहे. याचा फायदा नीरव मोदीच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत होऊ शकतो. त्यामुळे नीरव मोदी हा लवकरच भारताकडे सोपवला जाऊ शकतो.

भारतात पंजाब नॅशनल बँकेला 13000 कोटी रुपयांचा चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदीविरोधात लंडन सरकारने अटक वॉरंट जारी केला होता. काही दिवसांपूर्वी नीरव मोदी लंडनमध्ये फिरताना दिसला होता. सध्या लंडनमध्ये तो ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो आहे, त्या अपार्टमेंटची किंमत 70 कोटी रुपये आहे. ज्याचं भाडं महिन्याला 16 लाख रुपये आहे. इंग्लंडच्या माध्यमांच्या माहितीनुसार, नीरवने पुन्हा हिऱ्याचा व्यापार सुरु केला आहे.

मुंबईच्या विशेष न्यायालयाने नीरव मोदीची पत्नी अमी मोदीविरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. त्यांनी 3 कोटी डॉलर ट्रान्सफर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बँकेच्या खात्याचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे पैसे बँकेतून घेण्यात आलेल्या कर्जाचे असल्याचा संशय आहे. या पैशांनी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये एक मालमत्ता खरेदी करण्यात आली होती.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ईडीने नीरव मोदी विरोधात सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल केली आहे. ईडीने पीएमएलएअंतर्गत मनी लाँड्रिंग प्रकरणी नवीन चार्जशीट दाखल केली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.