Nirbhaya rape case | निर्भयाच्या मारेकऱ्यांच्या पापाचा घडा भरला, नराधमांना शुक्रवारी पहाटे फाशी

निर्भयाच्या मारेकऱ्यांना उद्या शुक्रवारी 20 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात येणार (nirbhaya rape case) आहे.

Nirbhaya rape case | निर्भयाच्या मारेकऱ्यांच्या पापाचा घडा भरला, नराधमांना शुक्रवारी पहाटे फाशी

नवी दिल्ली : अनेक कारणं देऊन फाशी टाळणाऱ्या निर्भयाच्या मारेकऱ्यांच्या पापाचा घडा भरला (Nirbhaya rape case) आहे. कारण दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने दोषींची याचिका फेटाळली आहे. निर्भयाच्या मारेकऱ्यांना उद्या शुक्रवारी 20 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातील (nirbhaya rape case) आरोपी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह या चारही नराधमांना तिहार जेलमधील तीन क्रमांकाच्या रुममध्ये फाशी दिली जाणार आहे.

आरोपी अक्षयने फाशी रोखण्यासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. मात्र राष्ट्रपतींनी ही दया याचिका फेटाळली. यावर अक्षयने पुर्नविचार याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी अक्षय कुमार सिंहची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान, आरोपींच्या वकीलांनी युक्तीवादादरम्यान पोलिसांवर अनेक आरोप केले. “अक्षयला पोलिसांनी अनेकदा मानसिक आणि शाररिक त्रास दिला. त्याच्यावर थर्ड डिग्रीचाही वापर केला. तसेच अक्षय या प्रकरणातील सर्वात तरुण मुलगा आहे. त्यामुळे कोर्टाने त्याच्यावर दया दाखवली पाहिजे,” असा युक्तीवाद आरोपीच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

या चौघांना भारत-पाकिस्तान बॉर्डरवर किंवा डोकलाम (भारत-चीन बॉर्डर) मध्ये पाठवा. पण त्यांना फाशी देऊ नका. या चौघांना फाशी दिल्याने बलात्कार कमी होणार नाही. जास्तीत जास्त 6 महिन्यांनी सर्व जण ही केस विसरतील. मात्र त्यांना फाशी दिल्याने एक कुटुंब उद्धवस्त होईल, असेही दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी दिली.

निर्भया बलात्कार प्रकरण

16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. या प्रकरणातील आरोपी मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय ठाकुर यांना 20 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशीची शिक्षा दिली जाणार (nirbhaya rape case) आहे.

संबंधित बातम्या :

निर्भया बलात्कार प्रकरण : तारीख टळली; पण फाशी नाही

निर्भया बलात्कार प्रकरण : आरोपींची फाशीवर अनिश्चित काळासाठी स्थगिती, पटियाला कोर्टाचा निर्णय

निर्भया सामूहिक बलात्कारातील दोषींची नवी खेळी, फाशीविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात

निर्भया बलात्कार-हत्येतील नराधमांच्या फाशीची तारीख ठरली, 22 जानेवारी सकाळी 7 वाजता लटकवणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *