मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबईतील आझाद मैदानावर देशाचे तुकडे करण्याची घोषणा देणाऱ्यांना सरकार खपवून घेतं आहे. मात्र अशा लोकांवर कारवाई झाली नाही, तर सरकारविरोधात आम्ही कडक भूमिका घेऊ, असा इशारा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Sharjeel Imam) यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून नाही : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 03, 2020 | 2:39 PM

नवी दिल्ली : “मुंबईतील आझाद मैदानावर देशाचे तुकडे करण्याची घोषणा देणाऱ्यांना सरकार खपवून घेत आहेत. मात्र अशा लोकांवर कारवाई झाली नाही, तर सरकारविरोधात आम्ही कडक भूमिका घेऊ, असा इशारा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Sharjeel Imam) यांनी दिला. ते राजधानी दिल्लीत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Devendra Fadnavis on Sharjeel Imam)

मतांच्या राजकारणासाठी काहीही खपवून घेऊ नका. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझी अपेक्षा नाही. पण मी अपेक्षा करतो की उद्धवजी यावर कारवाई करतील. तसे न झाल्यास देश तुम्हाला माफ करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन, आझाद मैदानातील आंदोलक हे देशद्रोहाचा गुन्हा असलेल्या शरजील इमामच्या बाजूने घोषणा देत असल्याचा दावा केला आहे. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले,  “आझाद मैदानावरची घटना गंभीर आहे. ‘शरजील तेरे सपने पुरे होंगे’ हे मुंबईत बोललं जात आहे. कोणंय हा शरजील? देशाचे तुकडे करण्याची घोषणा देणाऱ्यांना सरकार खपवून घेतंय. आता काहीही केलं तरी यांना भीती राहिली नाही कारण हे सरकार असंच आहे”.

केवळ मतांच्या राजकारणासाठी देशविरोधातील नारे खपवून घेणार असतील तर मग लोक माफ करणार नाहीत. विचारांमध्ये भिन्नता असू शकते, पण देशासोबत कोणतंही विरोधी विधान खपवून घेतलं जाणार नाही. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून नाही. त्यांना केवळ मतांचं राजकारण करायचं आहे. या सरकारमुळे अशा लोकांच्या मनातली भीती राहिली नाही. काहीही केलं तरी चालतं असा यांचा समज झाला आहे. कारवाई झाली नाही तर मग सरकारविरोधात आम्ही कडक भूमिका घेऊ, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

संबंधित बातम्या

6 राज्यांच्या पोलिसांचा शोध संपला, जेएनयू स्कॉलर शरजील इमामला अखेर अटक

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.