Pune Corona | पुण्यात साडे सात लाख नागरिकांची तपासणी होणार, महापालिकेचं नियोजन

पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता (Pune Corona Update) प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत.

Pune Corona | पुण्यात साडे सात लाख नागरिकांची तपासणी होणार, महापालिकेचं नियोजन

पुणे : पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता (Pune Corona Update) प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. पुणे महापालिका प्रशासनाने आता प्रतिबंधित क्षेत्रातील 7 लाख 50 हजार नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पुण्यात आतापर्यंत 2 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली (Pune Corona Update).

नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी सात दिवसांचं नियोजन करण्यात आलं आहे. सात दिवसांत 73 मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून स्क्रिनिंग केलं जाणार आहे. पुण्यातील पाच क्षेत्रीय कार्यालय परिसरात नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये भवानी पेठ, येरवडा, ढोले पाटील रोड, कसबा – विश्रामबाग वाडा, शिवाजीनगर-घोले रस्ता या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे, असं अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितलं.

पुण्यात येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. पुणे जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. परराज्यात, इतर जिल्ह्यात अडकलेले नागरिक आता एसटी आणि रेल्वे सुरु झाल्याने पुण्यात परतू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळे परराज्यात, जिल्हयात अडकलेल्या स्थलांतरित मजूर, इतर नागरिक पुणे जिल्ह्यात परतत आहेत. हे नागरिक बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनाने प्रवास करुन पुणे जिल्हयातील शहरी, ग्रामीण भागात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना संशयित रुग्ण प्रवास करुन आलेल्या प्रवाशांमधून आढळण्याची शक्यता आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे, विषाणुच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3105 वर

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 105 वर पोहोचला आहे. यापैकी पुणे शहरात 2 हजार 700 रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत 173 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत तब्बल 232 रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 136 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे 161 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये दोन नवजात बाळांना कोरोनाची बाधा, बाधितांचा आकडा 693 वर

कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीतील कोरोनाबाधितांचा आकडा 52 वर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *