AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाॅकडाऊनमध्ये परीक्षा घेणाऱ्या तळेगावातील महाविद्यालयावर प्रशासनाची मोठी कारवाई

पुण्यातील तळेगावात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत अकरावीची पुर्नपरीक्षा घेतली जात होती. यावेळी प्रशासनाने छापा टाकून या शैक्षणिक संस्थेवर कारवाई केली.

लाॅकडाऊनमध्ये परीक्षा घेणाऱ्या तळेगावातील महाविद्यालयावर प्रशासनाची मोठी कारवाई
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jun 12, 2020 | 7:17 PM
Share

पुणे : पुण्यातील तळेगावात लॉकडाऊनच्या नियमांचे (Talegaon 11th Class Re-Exam) उल्लंघन करत अकरावीची पुर्नपरीक्षा घेतली जात होती. यावेळी प्रशासनाने छापा टाकून या शैक्षणिक संस्थेवर कारवाई केली. याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तृतीय वर्ष वगळता इतर सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, या शैक्षणिक संस्थेने प्रशासनाच्या नियमांना धाब्यावर बसवत सर्रास (Talegaon 11th Class Re-Exam) पुर्नपरीक्षा घेतली.

तळेगाव दाभाडे येथील पंचवटी कॉलनीतील स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्टचे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्समध्ये लॉकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याचे उल्लंघन करत अकरावीची पुनर्परीक्षा घेतली जात होती. प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकत कारवाई केली.

मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे या संस्थेच्या संचालक मंडळ, प्राचार्य आणि संबंधित शिक्षक अशा एकुण चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे (Talegaon 11th Class Re-Exam). मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे, तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळ प्रशासकीय एस. एम. गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या ठिकाणी एकूण 27 विद्यार्थी परीक्षा देताना आढळून आले. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना केलेल्या आवाहनानंतरही सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी करणाऱ्या कुठल्या शैक्षणिक संस्थेवरील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

Talegaon 11th Class Re-Exam

संबंधित बातम्या :

Oxford सारख्या विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या, पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं : शरद पवार

दहावी-बारावीचा निकाल कधी? बोर्डाच्या अध्यक्षा म्हणतात…..

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची तयारी, अमित देशमुखांची राज्यपालांशी चर्चा

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, राज्यपालांची भूमिका, विद्यापीठ कायद्याची सरकारला आठवण

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...