दहावी-बारावीचा निकाल कधी? बोर्डाच्या अध्यक्षा म्हणतात…..

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षांविषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यातच आता दहावी-बारावीच्या निकालाचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे (SSC and HSC Exam result date).

दहावी-बारावीचा निकाल कधी? बोर्डाच्या अध्यक्षा म्हणतात.....
Follow us
| Updated on: Jun 08, 2020 | 8:57 PM

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षांविषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यातच आता दहावी-बारावीच्या निकालाचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे (SSC and HSC Exam result date). यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जात आहे. कारण याच निकालावर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य निश्चित होणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या निकालावर लागले आहे. याबाबत विचारणा केली असता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दहावी आणि बारावीच्या निकालाची सर्व विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलीय. मात्र यंदा हा निकाल आणखी लांबणीवर पडणार आहे. दहावी आणि बारावीचा निकालाचं काम अजून सुरुच आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी आणि उत्तरपत्रिका संकलन सुरु असल्याचं राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी सांगितलं आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाचं काम लॉकडाऊनमुळे थांबलं होतं. निकालाचं काम आटोक्यात आल्यानंतर बोर्डच तारीख जाहीर करतं. त्यामुळे आत्ता लगेच तारीख सांगता येणार नसल्याचं शकुंतला काळे यांनी सांगितलं.

शकुंतला काळे म्हणाल्या, “दहावी- बारावीच्या निकालाचं काम अजून चालू आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी अजून सुरु आहे. उत्तरपत्रिका संकलन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका संकलनाची कामंही थांबली होती. हे काम आटोक्यात आल्यानंतर बोर्डच दहावी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करेल. त्यामुळे आत्ता लगेच निकालाची तारीख सांगता येणार नाही.”

दहावी आणि बारावीचा निकाल साधारण मे आणि जून महिन्याच्या दरम्यान लागतो. मात्र हा निकाल ठरलेल्या वेळेनुसार परीक्षा झाल्यानंतर लागतो मात्र यंदा कोरोनामुळे परीक्षाही ही प्रभावित झाली. त्यातच परीक्षा न झालेल्या विषयाला इतर विषयांच्या सरासरीचे गुणांकन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

एकूणच लॉकडाऊनचा थेट फटका दहावी बारावीच्या निकालाला देखील बसल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने याधीच महत्वाचा निर्णय (SSC Geography paper marks) घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे सरासरी गुण देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे भूगोलाचा पेपर रद्द झाला होता. त्यामुळे आता इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून ते सरासरीचे गुण भूगोल विषयाला दिले जाणार आहेत. त्यामुळे आता उर्वरित विषयांचे गुण कधी निश्चित होणार हाच प्रश्न बाकी आहे.

याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना कार्यशिक्षण विषयाचे गुणही सरासरीनुसार मिळणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाने दिली आहे. राज्यात दहावीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च 2020 दरम्यान नियोजित होती.  सर्व पेपर झाल्यानंतर केवळ भूगोलाचा पेपर बाकी होता. मात्र कोरोना संकटामुळे हा पेपर आधी पुढे ढकलण्यात आला, मग शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा पेपर रद्द करत असल्याची घोषणा केली होती.

याआधी, शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर पहिला लॉकडाऊन सुरुवातीला 30 एप्रिलपर्यंत वाढवल्याने त्यावेळी भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दहावी-बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा

दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरत होत्या. महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाची चिंता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाच्या चुकीच्या तारखा व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. मात्र निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या  

SSC and HSC results date | दहावी आणि बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा, बोर्डाचं स्पष्टीकरण

दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

EXCLUSIVE : दहावी-बारावीचा निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाच्या अध्यक्षांना किती टक्के?

दहावी-बारावीचे निकाल वेळेत लावण्यासाठी एसएससी बोर्डाची लगबग 

SSC and HSC Exam result date

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.