वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची तयारी, अमित देशमुखांची राज्यपालांशी चर्चा

लॉकडाऊनदरम्यान वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान, या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची तयारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दाखवली आहे (Amit Deshmukh meet Governor Bhagatsingh Koshyari).

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची तयारी, अमित देशमुखांची राज्यपालांशी चर्चा

मुंबई :महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची (Amit Deshmukh meet Governor Bhagatsingh Koshyari) येत्या 15 जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची तयारी आहे. याबाबत आपण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना माहिती दिली आहे”, असं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं (Amit Deshmukh meet Governor Bhagatsingh Koshyari).

लॉकडाऊनदरम्यान वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान, या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची तयारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दाखवली आहे. याबाबत अमित देशमुख यांनी आज (4 जून) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या आणि तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 15 जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असं अमित देशमुख यांनी सांगितलं.

दरम्यान, काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास याबाबत परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निश्चित केले जाईल, अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली. “15 जुलैपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी करावी”, असे आवाहन अमित देशमुख यांनी केलं आहे.

संबंधित बातमी : 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *