सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन महिन्यांची स्थगिती द्या, RBI चा बँकांना सल्ला

कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयही (Three months moratorium for EMI) मैदानात उतरली आहे.

सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन महिन्यांची स्थगिती द्या, RBI चा बँकांना सल्ला

मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयही (Three months moratorium for EMI) मैदानात उतरली आहे. लॉकडाऊनच्या काळात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात (Three months moratorium for EMI)  मोठी कपात केली. आरबीआयने रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात केली. त्यामुळे रेपो दर 5.15 वरुन 4.40 टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दर 4.9 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांवर आला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्व प्रकाराच्या कर्जावरील व्याजदर कमी होतील.

यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेने अन्य बँकांना सल्ला दिला आहे की पुढील ३ महिने कोणत्याही कर्जावरील हप्ते अर्थात EMI ला स्थगिती द्या. आरबीआयने केवळ सल्ला दिला आहे. त्यामुळे हा सल्ला बँका ऐकणार का हे पाहावं लागेल.

लॉकडाऊनच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना अर्थात ‘बूस्ट’ देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे रेपो दरात 75 बेसिस पॉईंटची कपात केली.

याशिवाय कुठल्या कर्जावरील ईएमआयला स्थगिती द्यायची हे बँकांनीच ठरवावं, असंही आरबीआयने म्हटलं आहे. त्यामुळे किरकोळ, व्यावसायिक की वैयक्तिक कर्ज याबाबत सर्वसामान्यांना गोंधळ आहे.

दरम्यान, आरबीआयचा रेपो रेट कपातीचा निर्णया ऐतिहासिक आहे. कारण आरबीआयच्या इतिहासातील सर्वात मोठी कपात आहे. गेल्या दोन तिमाहींमध्ये आरबीआयने रेपो दरांबाबत कोणतेही बदल केले नव्हते.

रेपो दरातील कपातीचा फायदा गृहकर्ज, कार किंवा अन्य प्रकारच्या कर्जासह ईएमआय भरणाऱ्या कोट्यवधी कर्जदारांना होणार आहे. याशिवाय नव्याने कर्ज घेणाऱ्यांनाही कमी व्याजदराने कर्ज मिळेल.

यावेळी गव्हर्नर शक्तिकांस दास म्हणाले, “कोरोनामुळे जगभरात आर्थिक मंदीचं सावट आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेवर आमचं लक्ष आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याचं आरबीआयचं ध्येय आहे”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *