बिहारमध्ये आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा, नातेवाईकांचा कोरोना रुग्णाच्या मृतदेहासोबत प्रवास

देशभरात कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, बिहारमध्ये मोठ्या निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे (Corona Virus in Bihar).

बिहारमध्ये आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा, नातेवाईकांचा कोरोना रुग्णाच्या मृतदेहासोबत प्रवास

पटना : देशभरात कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, बिहारमध्ये मोठ्या निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे (Corona Virus in Bihar). रविवारी (22 मार्च) पटनामध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गाने एका रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच काही इतर रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. एम्स पटनाचे संचालक प्रभात कुमार यांनी याला दुजोरा दिला आहे. या प्रकरणात एम्स (AIIMS) प्रशासन आणि आरोग्यविभागाचा निष्काळजीपण समोर आला आहे. कोरोना बाधिक रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृतदेहासोबतच प्रवास केल्याचंही समोर आला आहे.

मृत रुग्णाचं नाव सैफ अली असं आहे. तो कतार येथून परतला होता. बिहारच्या आरोग्य विभागाचे सचिव संजय कुमार यांनी देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. सैफ अलीच्या कोरोना संसर्गाचा अहवाल आजच आला. त्यात तो कोरोना पॉझिटीव्ही असल्याचं समोर आलं. त्यामुळे मृत रुग्णाच्या मृतदेहासोबत प्रवास करणाऱ्या सर्व रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. नातेवाईकांनी मुंगेर येथून पटनापर्यंत कोरोना बाधित रुग्णाच्या मृतदेहासोबत प्रवास केला. यानंतर नागरिकांमधून बिहार आरोग्य खात्याच्या कारभारावर गंभीर प्रश्न विचारले जात आहे.

संबंधित रुग्ण पटनाच्या नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (एनएमसीएच) दाखल होता. त्याला कोरोनाची लक्षणं होती. तो स्कॉटलंड येथून भारतात परतला होता. त्यामुळे आता त्याच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यांचा आरोग्य विभागाकडून शोध घेतला जात आहे.

कोरोना व्हायरलचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही याचे तीव्र पडसाद पडताना दिसत आहेत. त्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं. भारतात 326 लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. हा आकडा वाढताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

Corona Death India | देशात ‘कोरोना’चा सहावा बळी, पाटणामध्ये एकाचा मृत्यू

मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवू नका, माझे कुटुंबीयही कॉरन्टाईन : संजय राऊत

Corona | कोरोनाचा हाहा:कार! गेल्या 24 तासात इटलीत 793 जणांचा मृत्यू

Corona Virus in Bihar

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *