Corona | कोरोनाचा हाहा:कार! गेल्या 24 तासात इटलीत 793 जणांचा मृत्यू

इटलीमध्ये एका दिवसात 793 जणांचा बळी या कोरोना विषाणूने घेतला आहे.

Corona | कोरोनाचा हाहा:कार! गेल्या 24 तासात इटलीत 793 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 22, 2020 | 9:08 AM

नवी दिल्ली : चीननंतर कोरोना विषाणूचा सर्वाधिक (Corona Deaths In Italy) प्रभाव हा इटलीमध्ये पाहायला मिळत आहे. इटलीमध्ये एका दिवसात 793 जणांचा बळी या कोरोना विषाणूने घेतला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, गेल्या 24 तासात इटमीमध्ये 793 कोरोनाग्रस्त (Corona Deaths In Italy) रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 4,825 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काल परवा दवसभरात इटलीमध्ये 627 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. दुसरीकडे, इटलीमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांच्या संख्येत झपाट्याने लाढ होत आहे. इटलीत गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 47,021 वरुन 53,578 वर येऊन पोहोचली आहे.

हेही वाचा : कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी

या जीवघेण्या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 12,000 लोकांचा बळी गेला आहे. तर अडीच लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दुसरीकडे, चीनमधून एक दिलासादायक बातमी आहे. चीनमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये कोरोना संसर्ग झाल्याचा एकही नवा रुग्ण (Corona Deaths In Italy) आढळून आलेला नाही.

इटलीमध्यो कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. त्यामुळे इटलीमध्ये अडकलेल्या 263 भारतीय विद्यार्थ्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने मायदेशी आणण्यात येत आहेत.

अमेरिकेचे उपराष्ट्रपतींची कोविड-19 टेस्ट

अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेन्स यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आळं. त्यानंतर त्यांची आणि त्यांच्या पत्नीची कोरोना टेस्ट करण्यात आल्याची माहिती आहे.

इराणमध्ये आतापर्यंत 1,556 लोकांचा मृत्यू

इराणमध्ये कोरोनामुळे आणखी 123 जणांना मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच आता इराणमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1556 वर येऊन पोहोचली आहे. इराणमध्ये आतापर्यंत 20,610 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं (Corona Deaths In Italy) स्पष्ट झालं आहे.

संबंधित बातम्या :

जगभरात कोरोनाचं थैमान, चीन, इटलीनंतर स्पेन आणि इराणमध्येही हाहाकार, कोणत्या देशात किती मृत्यू?

कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी

कोरोना प्यार है : बायकोपासून लपून गर्लफ्रेंडसोबत इटलीला गेला, आणि कोरोना झाला…

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी, लवकरच बाजारात उपलब्ध होणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.