कोरोना प्यार है : बायकोपासून लपून गर्लफ्रेंडसोबत इटलीला गेला, आणि कोरोना झाला...

ब्रिटनमधील एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत खोटं बोलून प्रेयसीसोबत इटलीला फिरायला गेला (Husband infected corona during Italy tour)  होता.

कोरोना प्यार है : बायकोपासून लपून गर्लफ्रेंडसोबत इटलीला गेला, आणि कोरोना झाला...

लंडन (इग्लंड) : ब्रिटनमधील एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत खोटं बोलून प्रेयसीसोबत इटलीला फिरायला गेला (Husband infected corona during Italy tour)  होता. इटलीला फिरायला गेला असताना त्याला तिथे कोरोनाची लागण झाली. त्यामुळे सध्या त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु (Husband infected corona during Italy tour)  आहेत.

या व्यक्तीच्या पत्नीला आपला पती प्रेयसीसोबत इटली फिरायला गेला होता याची अजून कल्पना नाही. पतीने उद्योग संबंधित काम आहे असे सांगून आपल्या प्रेयसीसोबत इटली फिरण्यास गेला होता.

“हा 30 वर्षाचा व्यक्ती आहे. कोरोना झाल्यामुळे त्याला वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले आहे. त्याच्या पत्नीला अजूनही माहित नाही की, पतीला कोरोनाची लागण कशी झाली”, असं म्हटलं जात आहे.

कोरोनाची लक्षण दिसल्यानंतर या व्यक्तीने इंग्लंडमधील पब्लिक हेल्थ कोऑर्डिनेटरमध्ये जाऊन इटलीवरुन आल्याचे सांगितले. त्यानंतर या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात चाचणी केल्यानंतर स्पष्ट झाले की या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

या व्यक्तीने रुग्णालयातील डॉक्टरला सांगितले की, “माझे एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. ज्यावेळी प्रेमिकाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिचे नाव सांगण्यास त्याने नकार दिला.”

दरम्यान, या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या पत्नीने स्वत:ला घरात आयसोलेशन करुन ठेवले आहे. तसेच डॉक्टरांकडूनही तिच्यावर लक्ष ठेवले जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *