‘सूर्यवंशी’ ठरणार आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफचा ‘पहिला लाभार्थी’

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षयकुमार आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला 'सूर्यवंशी' चित्रपट 24 मार्चला प्रदर्शित होणार आहे

'सूर्यवंशी' ठरणार आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफचा 'पहिला लाभार्थी'
Follow us
| Updated on: Feb 24, 2020 | 1:07 PM

मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘नाईट लाईफ’ योजनेचा ‘पहिला लाभार्थी’ ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट ठरणार आहे. मुंबईतील थिएटर येत्या 24 मार्चपासून 24 तास सुरु राहणार आहेत. त्यामुळे मुंबईकर प्रेक्षक दिवसाच्या कुठल्याही प्रहरी सूर्यवंशी चित्रपटाचा खेळ पाहू शकणार (Sooryavanshi Movie Night Life) आहेत.

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षयकुमार आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सूर्यवंशी’ चित्रपट मंगळवारी संध्याकाळी प्रदर्शित होणार आहे. बुधवारी म्हणजेच 25 मार्चला गुढीपाडव्याची सुट्टी आहे. मराठी नूतन वर्षाच्या आदल्या दिवशी सिनेमा रिलीज करुन प्रेक्षकांसाठी ‘लाँग वीकेंड’ तयार करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार एटीएस प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी शुक्रवार 27 मार्चाला सिनेमा रिलीज करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु ठाकरे सरकारच्या नव्या योजनेनंतर ही तारीख बदलण्यात आली.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाचं चांगल्याप्रकारे मार्केटिंग करण्यात येत आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये लहान मुलांचा उत्तम वापर केला आहे. ‘सूर्यवंशी’च्या टीझरमध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंह या दोघांचंही दर्शन घडतं. रोहित शेट्टीने इन्स्टाग्राम, तर अक्षयकुमारने ट्विटरवरुन हा टीझर शेअर केला आहे.

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ सिनेमाचा सिक्वेल असलेल्या ‘सिम्बा’ चित्रपटात अक्षयने ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची घोषणा केली होती. रणवीर सिंहच्या ब्लॉकबस्टर ‘सिम्बा’ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले होते.

Sooryavanshi Movie Night Life

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.