युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून पीएसआयला मारहाण

तुळजापूर : गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांकडून पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. नुकतंच तुळजापूरमधील युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे असे या पोलिसांचे नाव आहे. या घटनेनंतर जखमी गणेश झिंझुरडे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी (27 मे) दुपारच्या सुमारास तुळजापूरमधील युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून …

युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून पीएसआयला मारहाण

तुळजापूर : गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांकडून पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. नुकतंच तुळजापूरमधील युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे असे या पोलिसांचे नाव आहे. या घटनेनंतर जखमी गणेश झिंझुरडे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सोमवारी (27 मे) दुपारच्या सुमारास तुळजापूरमधील युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर गाड्या लावल्या होत्या. त्यादरम्यान पोलिस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे हे जात असताना, युवासेना तालुकाप्रमुख प्रदीप रोचकरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर गाड्या का लावल्या? अशी विचारणा केली.

या शुल्लक कारणावरुन युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून गणेश यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. या मारहाणीची काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या व्हिडीओत काही तरुण पोलिसांना  शिवीगाळ करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. दरम्यान इतर तरुणांचा शोध सुरू आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *