Corona : येवल्यात कोरोनाचा शिरकाव, मालेगावच्या संपर्कात असलेल्या महिलेला कोरोना

मालेगावात कोरोनाने भीषण रुप घेतल्यानंतर आता येवल्यात एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

Corona : येवल्यात कोरोनाचा शिरकाव, मालेगावच्या संपर्कात असलेल्या महिलेला कोरोना
Follow us
| Updated on: Apr 25, 2020 | 9:03 AM

नाशिक : येवल्यात कोरोनाबाधित (Yewala First Corona Patient) पहिला रुग्ण आढळून आल्याने शहरात दहशतीचं वातावरण आहे. मालेगावात कोरोनाने भीषण रुप घेतल्यानंतर आता येवल्यात एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ही महिला मालेगावच्या (Yewala First Corona Patient) संपर्कात असल्याची माहिती आहे.

मालेगाच्या संपर्कात असल्याने या महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. येवल्यात एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या महिलेला गुरुवारी कोरोनाची लक्षणं आढळून आल्याने तिला नाशिकला हलवण्यात आले. तिथे तिचा कोव्हिड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

यानंतर शहरात धाकधूक वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून येवला शहरातील तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे (Yewala First Corona Patient).

कोरोनाबाधित महिलेच्या 9 नातेवाईकांच्या कोरोना तपासणीसाठी नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची चौकशी आणि तपासणीही होणार आहे.

मालेगावात कोरोनाचं थैमान 

मालेगावात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मालेगावात काल (24 एप्रिल) आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे सहाही जण एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे आता मालेगावातील कोरोनाबाधितांची संख्या ही 116 वर येऊन पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 130 झाली आहे.

राज्यातील स्थिती काय?

महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे. काल (24 एप्रिल) दिवसभरात एकूण 394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 117 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यभरात 957 रुग्ण बरे झाले आहेत. तर, एकूण 5 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत महाराष्ट्रात 1 लाख 2 हजार 189 कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले, तर 6 हजार 817 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

Yewala First Corona Patient

संबंधित बातम्या :

अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करत मुंबई ते सांगली प्रवास, तरुणीला कोरोनाची लागण, पाच जणांवर गुन्हे

वाशिम जिल्हा कोरोनामुक्त, जिल्ह्यातील एकमेव रुग्ण कोरोना निगेटिव्ह

पुण्याची धाकधूक वाढली, दोन दिवसात 208 नवे कोरोना रुग्ण आणि 8 मृत्यू

Corona : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 6817 वर, कोठे किती रुग्ण?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.