वाशिम जिल्हा कोरोनामुक्त, जिल्ह्यातील एकमेव रुग्ण कोरोना निगेटिव्ह

वाशिम जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये होणार असल्याने जिल्हावासियांकडून आनंद व्यक्त होत (Washim Corona Free District) आहे.

वाशिम जिल्हा कोरोनामुक्त, जिल्ह्यातील एकमेव रुग्ण कोरोना निगेटिव्ह

वाशिम : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना वाशिम जिल्हा (Washim Corona Free District) मात्र कोरोनामुक्त झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील एकमेव कोरोनाबाधित रुग्णाच्या दोन्ही चाचण्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्हा ग्रीन झोनमध्ये आल्याने आनंदही व्यक्त केला जात आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनसह इतर सर्व बाबी पूर्वीप्रमाणे राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली.

वाशीम जिल्ह्यातील मेडशी येथील 65 वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित (Washim Corona Free District) आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना रुग्णाच्या नातेवाईकासह संपर्कात आलेल्या 12 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या तपासण्या केल्या. तसेच कोरोना विषाणूंच्या संसर्गाची लागण झाल्यानंतर संपूर्ण मेडशी गाव सील केलं होतं.

त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र तरीही जिल्ह्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह होता. आरोग्य विभागाकडून सुरु असलेल्या औषधपचारास प्रतिकूल प्रतिसाद देत या रुग्णाची 14 दिवसांनंतर पुन्हा चाचणी घेण्यात आली. या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या.

या रुग्णाच्या दोन्ही चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला. आरोग्य विभागाला मिळालेल्या या यशामुळे वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या शर्थीच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात येत आहे. तर वाशिम जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये होणार असल्याने जिल्हावासियांकडून आनंद व्यक्त होत (Washim Corona Free District) आहे.

संबंधित बातम्या : 

Corona : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 6817 वर, कोठे किती रुग्ण?

Nitin Gadkari Exclusive | देशातील लॉकडाऊन वाढणार का? नितीन गडकरी म्हणतात…

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *