फायजरची लस भारतातील चाचण्यांमध्ये फेल, वॅक्सिनच्या विक्रीला परवानगीची मागणी, भारताचा निर्णय काय?

अमेरिकेतील फायजर कंपनीनं भारतात मंजुरी पूर्वीच लसीच्या विक्रीला परवानगी देण्याची मागणी केलीय. American corona vaccine pfizer

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:55 PM, 26 Jan 2021
फायजरची लस भारतातील चाचण्यांमध्ये फेल, वॅक्सिनच्या विक्रीला परवानगीची मागणी, भारताचा निर्णय काय?
कोरोना लस

नवी दिल्ली: भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सीरम इनस्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आलीय. मात्र, अमेरिकेतील फायजर कंपनीनं भारतात मंजुरी पूर्वीच लसीच्या विक्रीला परवानगी देण्याची मागणी केलीय. भारतान फायजरच्या मागणीला मंजुरी दिलेली नाही. (American corona vaccine pfizer request India to approve vaccine without final approval)

अमेरिकेतील फायजर कंपनीनं यापूर्वी भारत सरकारकडे लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी याचिका केली होती. मात्र, भारत सरकारनं फायजर कंपनीच्या लसीला मंजुरी दिली नव्हती. भारत सरकारनं ऑक्सफर्ड आणि अ‌ॅस्ट्रोझेनका तर्फे भारतातील सीरम इनस्टिट्यूटमध्ये बनवण्यात आलेल्या कोविशील्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. तर भारत बायोटेकनं बनवलेल्या कोवॅक्सिन लसीचा वापर करण्यास परवानगी देण्यात आलीय. तर, झायडस कॅडिलाच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला मंजुरी देण्यात आली.

भारत सरकारच्या सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये फायजरची लस चाचण्यांमध्ये अपयशी ठरली होती. CDSCO ने फायजरच्या लसीच्या स्थानिक चाचण्या करण्यापूर्वी लसीला मंजुरी देण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतली. भारत सरकारनं फायजरचा प्रस्ताव नाकारला आहे.

फायजरचा दावा काय?

अमेरिकन फायजर कंपनीनं जर्मनीतील बायोएनटेक कंपनीसोबत मिळून प्रभावी कोरोना लस तयार केल्याचा दावा केला आहे. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, इस्त्रालय आणि यूरोपियन युनियनमधील देशांनी लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द दिली आहे. त्यामुळे भारत सरकारनंही लसीच्या वापराला परवानगी देण्याची विनंती फायजरने केली होती.

भारतानं कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सीरम इनस्टिट्यूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मंजुरी दिली आहे. सध्या भारतात पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरु आहे. तर, परदेशातूनही कोविशील्ड लसीची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. आता पर्यंत सीरम इनस्टिट्यूट कोविशील्ड लसीचे 50 लाख डोस विविध देशांना दिले आहेत. कोरोना लसीच्या गुणवत्तेबाबत भारतीय लसींनी चीनच्या लसींना मागं टाकल्याचं चित्र आहे.

चीनच्या कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह

ब्राझीलमध्ये चीनमधून पुरवण्यात आलेल्या कोरोनावॅक लसीच्या परिणामकारतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. माडर्ना, फायझर आणि अ‌ॅस्ट्रोझेनका लसींच्या तुलनेत कोरोनावॅकची परिणामकारकता कमी आहे. कोरोनावॅकची इंडोनेशियामध्ये केलेल्या चाचणीमध्ये परिणामकारकता 65.3 टक्के आढळली होती.

संबंधित बातम्या:

कोव्हॅक्सीन लसीविषयी धास्ती; जे.जे. रुग्णालयात दिवसभरात 100 पैकी केवळ 13 जण लसीकरणास हजर

Corona Vaccine : कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सची भीती वाटतेय? जाणून घ्या लस निर्मिती कंपन्यांच्या महत्वाच्या सूचना

American corona vaccine pfizer request India to approve vaccine without final approval)