चीनची कोरोना लस घेणाऱ्या देशांची चिंता वाढली, सीरमच्या Covishield लसीला ब्राझील, इंडोनेशियाची पसंती

भारतात तयार झालेल्या कोविशील्ड लसीला ब्राझील, इंडोनेशिया, कंबोडिया आदी देशांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. ( Covishield corona Vaccine)

चीनची कोरोना लस घेणाऱ्या देशांची चिंता वाढली, सीरमच्या Covishield लसीला ब्राझील, इंडोनेशियाची पसंती
कोविशील्ड लस
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 6:36 PM

नवी दिल्ली: भारतानं कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सीरम इनस्टिट्यूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मंजुरी दिली आहे. सध्या भारतात पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरु आहे. तर, परदेशातूनही कोविशील्ड लसीची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. आता पर्यंत सीरम इनस्टिट्यूट कोविशील्ड लसीचे 50 लाख डोस विविध देशांना दिले आहेत. कोरोना लसीच्या गुणवत्तेबाबत भारतीय लसींनी चीनच्या लसींना मागं टाकल्याचं चित्र आहे. (Many countries demands India made corona vaccine covishield)

ब्राझील, कंबोडियाची कोविशील्डला पसंती

ब्राझील आणि कंबोडिया या देशांनी चीनकडून कोरोना लसीचे डोस घेतले होते. चीनच्या कोरोना लसीच्या परिणामकारतकेविषयी शंका निर्माण झाल्यानंतर दोन्ही देशांनी कोविशील्डकडला पसंती दिली आहे. सीरम इनस्टिट्यूटनं शुक्रवारी ब्राझीलला 20 लाख लसीचे डोस दिले आहेत.

ब्राझीलनं मानले नरेंद्र मोदींचे आभार

ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांनी कोरोना विषाणू प्रतिरोधक कोविशील्ड लसीचे 20 लाख डोस पुरवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. 8 जानेवारीला बोलसोनारो यांनी कोरोना लसीचे डोस मिळण्यासाठी विनंती केली होती. येत्या आठवड्यात ब्राझीलमध्ये कोरोना लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे.

इंडोनेशियाला हवीय भारतीय लस

इडोनेशियाला कोरोना लसीकरणसाठी चीननं कोरोनावॅकचे तीस लाख डोस मिळाले होते. कोरोनावॅक चीननं विकसित केलेली आहे. चीनकडून लस उपलब्ध होऊनही इंडोनेशियाला कोविशील्ड लसीचे डोस हवे आहेत. इंडोनेशियाच्या सरकारची सीरम इनस्टिट्यूट सोबत चर्चा सुरु आहे.

कंबोडियाची भारताशी चर्चा

कंबोडियाचे पंतप्रधान हून सेन यांनी सोमवारी भारतीय उच्चायुक्त देवयानी खोब्रागडे यांच्याशी कोरोना लस मिळण्यासाठी चर्चा केली. कंबोडियानं भारतात तयार झालेल्या कोविशील्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लस उपलब्ध व्हावी असं म्हटलंय. चीनने कंबोडियाला सिनोवॅक वॅक्सिनच्या 5 लाख कोरोना लसींचे डोस दिले आहेत. कंबोडिया त्यांच्या देशातील 1 कोटी 70 लाख जनेताला कोरोना लसीचे डोस देण्याच्या तयारीत आहे.

चीनच्या कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह

ब्राझीलमध्ये चीनमधून पुरवण्यात आलेल्या कोरोनावॅक लसीच्या परिणामकारतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. माडर्ना, फायझर आणि अ‌ॅस्ट्रोझेनका लसींच्या तुलनेत कोरोनावॅकची परिणामकारकता कमी आहे. कोरोनावॅकची इंडोनेशियामध्ये केलेल्या चाचणीमध्ये परिणामकारकता 65.3 टक्के आढळली होती.

संबंधित बातम्या:

कोव्हॅक्सीन लसीविषयी धास्ती; जे.जे. रुग्णालयात दिवसभरात 100 पैकी केवळ 13 जण लसीकरणास हजर

Corona Vaccine : कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सची भीती वाटतेय? जाणून घ्या लस निर्मिती कंपन्यांच्या महत्वाच्या सूचना

(Many countries demands India made corona vaccine covishield)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.