Corona Vaccine : कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सची भीती वाटतेय? जाणून घ्या लस निर्मिती कंपन्यांच्या महत्वाच्या सूचना

भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटने फॅक्टशीट जारी करुन कोरोनाची लस कुणी घ्यावी आणि कुणी नाही, याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

Corona Vaccine : कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सची भीती वाटतेय? जाणून घ्या लस निर्मिती कंपन्यांच्या महत्वाच्या सूचना
सरकारने बनवले हे नवीन नियम, आता लसीची कमतरता भासणार नाही
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 4:12 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात 16 जानेवारीपासून करण्यात आली आहे. पण कोरोना लसीबाबत साईड इफेक्ट्सला घेऊन सुरु असलेल्या चर्चेमुळं अनेक लोक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटने फॅक्टशीट जारी करुन कोरोनाची लस कुणी घ्यावी आणि कुणी नाही, याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.(Important Suggestions from Bharat Biotech and Serum Institute on Side Effects)

या बाबी लक्षात ठेवा

भारत बायोटेकने जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये एखाद्याला कुठल्याही प्रकारचा आजार असेल तर त्यांनी कोरोना लस टोचून घेऊ नये, अशी सूचना केली आहे. जर कुठल्याही आजारामुळे तुमची इम्युनिटी पॉवर कमी झाली असेल आणि तुम्ही इम्युनिटी पॉवर संबंधी कुठल्याही प्रकारचे औषध घेत असाल तर तुम्ही ‘कोव्हॅक्सिन’ घेऊ नका, असा सल्ला भारत बायोटेकनं दिला आहे. यापूर्वी केद्र सरकारनं सूचना केली होती, की तुम्ही इम्युनोडिफिशिएन्सीने ग्रस्त आहात किंवा इम्युनिटी सप्रेशनवर म्हणजे तुम्ही एखाद्या ट्रिटमेंटसाठी इम्युनिटी पॉवर कमी करत आहात तर तुम्ही कोरोना लस घेऊ शकता. पण आता भारत बायोटेकने अशा लोकांना कोव्हॅस्कीन न घेण्याचा सल्ला दिला आहे.

किती लोकांना साईड इफेक्ट्स?

16 जानेवारीपासून देशात सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने निर्मिती केलेल्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकने निर्माण केलेल्या कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर आतापर्यंत साईड इफेक्ट्स झालेले 541 प्रकरणं समोर आली आहेत. कोरोना लस घेतल्यानंतर होणाऱ्या साईड इफेक्ट्सबाबत पहिल्यांदा भारत बायोटेकने फॅक्टशीट जारी केली होती. त्यानंतर आता सिरम इन्स्टिट्यूटनेही कुणाला कोव्हिशील्ड लस घेता येईल आणि कुणाला नाही, याबाबत सूचना जारी केली आहे. एखादी व्यक्ती रोज कुठलं औषध घेत आहे. काही दिवसांपासून ताप आहे. रक्ताशी संबंधीत कुठला आजार आहे, तर तुम्ही कोव्हिशील्ड लस घेऊ नका, असा सल्ला दिला आहे. तसंच गर्भवती महिला आणि मुलांना दूध पाजणाऱ्या महिलांनी कोरोना लस घेऊ नये, असं सांगितलं आहे.

तुम्ही कोरोना लस घेऊ शकता की नाही?

> जर तुम्हाला कुठलं औषध, खाण्याचा पदार्थ किंवा कुठल्या दुसऱ्या कारणाने कुठली अॅलर्जी असेल तर तुम्ही कोव्हिशील्डची लस घेऊ नका >> तुम्हाला ताप आला असेल तर तुम्ही लस घेऊ नका >> जर तुम्ही थॅलेसिमियाचे रुग्ण आहात किंवा अन्य कुठला रक्ताचा आजार आहे, तर तुम्ही कोरोना लस घेऊ नये. >> एखादी महिला गर्भवती आहे किंवा गर्भधारणेचा विचार करत आहात, तर तुम्ही कोरोना लस घेऊ नये. >> एखादी महिला आपल्या बाळाला दूध पाजत असेल, तर त्यांनी लस घेऊ नये. >> कोरोनाबाबत तुम्ही यापूर्वीच एखादी लस घेतली असेल तर तुम्ही कोव्हिशील्ड लस घेऊ नका. >> त्याचबरोबर लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तुम्हाला कुठली अॅलर्जी झाली असेल तर तुम्ही दुसरा डोस घेऊ नका.

संबंधित बातम्या :

COVID 19 Vaccine: लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 1 लाख 65 हजार आरोग्य सेवकांना लस, मात्र टार्गेट अपूर्ण!

Important Suggestions from Bharat Biotech and Serum Institute on Side Effects

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.