COVID 19 Vaccine: लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू

COVID 19 Vaccine:  लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू
COVID-19 Vaccination

16 जानेवारीला महिपाल यांना कोरोनाची लस देण्यात आली होती. ही लस घेतल्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानकपणे ढासळली. | COVID 19 Vaccine

Rohit Dhamnaskar

|

Jan 19, 2021 | 11:11 AM

लखनऊ: देशात कोरोना लसीकरणाला (Corona vaccination) सुरुवात झाल्यानंतर आता लसीच्या दुष्परिणामाच्या घटना मोठ्याप्रमाणावर समोर येताना दिसत आहेत. कोरोनाची लस घेतल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम जाणवतील, ही बाब अगोदरच केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आली होती. मात्र, उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे कोरोनाची लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (One Covid Warrior died after taking corona vaccine shot)

या व्यक्तीचे नाव महिपाल असून ते रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कामाला होते. 16 जानेवारीला महिपाल यांना कोरोनाची लस देण्यात आली होती. ही लस घेतल्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानकपणे ढासळली. त्यानंतर महिपाल यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

औरंगाबादेत 90 जणांना कोरोना लसीची रिअ‍ॅक्शन

औरंगाबादेत 90 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीची रिअ‍ॅक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. येथील 352 स्वयंसेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली होती. यापैकी तब्बल 90 जणांना रिअ‍ॅक्शन, ताप, मळमळ आणि अंगदुखीचा त्रास जाणवत आहे.

भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन घेण्यास ‘त्या’ डॉक्टरांचा नकार

राज्यभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आता काही डॉक्टरांकडून स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन (Bharat Biotech covaxin) लस घेण्यास नकार देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला होता.

कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अपूर्ण असल्यामुळे या लसीच्या परिणामकारकतेबद्दल अद्याप साशंकता आहे. मात्र, तरीही केंद्र सरकारने या लसीला परवानगी दिल्यामुळे वादही निर्माण झाला होता. मात्र, आता डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनीच ही लस टोचून घेण्यास नकार दिल्याने पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘लसीकरणासाठी पुढाकार घ्या, अशिक्षित लोकांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवा’

कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार देऊ नये. तुम्ही लस घेऊन अशिक्षित लोक आणि ग्रामीण भागापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवला पाहिजे, असे आवाहन राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना केले होते.

राज्यात कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रमक तीन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन आणि तिसऱ्या टप्प्यात व्याधी असणाऱ्या (को-मॉर्बिडिटी) असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाईल.

कोरोनाच्या लसीमुळे कोणते साईड इफेक्टस होऊ शकतात?

कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काहीजणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो. यामध्ये लस दिलेल्या भागात सूज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा लक्षणांचा समावेश आहे. तर काहीजणांना ताप येणे किंवा चक्कर येण्यासारखी सामान्य लक्षणे जाणवू शकतात. शरीराला खाज येणे किंवा घाम सुटणे ही लक्षणे सामान्य नसली तरी त्यामुळे जीवघेणा धोका उद्भवणार नाही, अशी हमी राजेश टोपे यांनी दिली होती.

संबंधित बातम्या:

Corona Caller Tune: कोरोनाच्या ‘कॉलर टय़ून’मुळे डोक्याला ताप; दररोज तीन कोटी तास वाया

कधी संपणार कोरोनाचं संकट? वाचा प्रख्यात व्हायरोलॉजिस्ट डॉ. जेकब काय म्हणतात…

‘कोरोनामुळे पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही’, फारुक अब्दुलांच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा

(One Covid Warrior died after taking corona vaccine shot)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें