AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Vaccination | आजचा क्षण अभिमानाचा आणि आनंदाचा, कोविड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांची प्रतिक्रिया

मे महिन्यापर्यंत भारतामध्ये कोरोनाच्या 6 लसी उपलब्ध होतील, अशी माहिती कोविड टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक यांनी दिली. (Sanjay Oak Corona Vaccination)

Corona Vaccination | आजचा क्षण अभिमानाचा आणि आनंदाचा, कोविड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांची प्रतिक्रिया
डॉ.संजय ओक, कोविड टास्क फोर्स प्रमुख
| Updated on: Jan 16, 2021 | 3:11 PM
Share

सांगली: राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी आजचा दिवस हा अभिमानाचा आणि आनंदाचा असल्याचं म्हटलं आहे. भारतात आज जगामधील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. देशासाठी आनंदाची बाब म्हणजे आपल्या देशात निर्माण केलेल्या दोन लसींच्या माध्यमातून ही सुरुवात झाली आहे.शासकीय स्तरावर लसीकरणाचे चांगले आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. संजय ओक यांनी दिली. (Dr. Sanjay Oak said corona vaccination day is glorious and joyful for us)

मतदानाप्रमाणं शांततेत लस घ्यावी

डॉ.संजय ओक यांनी ही लस तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार असल्याचं सांगितलं. आज पहिल्या स्तरात राज्यातील हेल्थ केअर वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. सर्वांचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले आहे. लस घेण्यासाठी आल्यानंतर गडबड करु नये, मतदान ज्याप्रमाण शांततेत रांगेत उभं राहून करतो. त्याप्रमाणे लस घ्यावी. कोरोना लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीनं अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबणं आवश्यक असल्याचं संजय ओक यांनी स्पष्ट केले. कोरोना लस घेण्यासाठी आल्यानंतर काही प्रश्न विचारले जाणार आहेत. ज्या व्यक्तींना अ‌ॅलर्जी आहे, त्यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार नसल्याचेही ओक म्हणाले.

लसीकरणानंतर केंद्रावर अर्धातास थांबावे लागणार

केंद्र सरकारनं कोरोना लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. लस घेतल्या नंतर 99% टक्क्या हून अधिक लोकांना काहीही होणार नाही. उलटी येणे, मळ मळ होतेय अस वाटू नये म्हणून लस दिल्यावर लसीकरण केंद्रावर अर्धा तास थांबवून घेतले जाणार आहे, असं संजय ओक यांनी सांगितले.

सोमवारी लस घेणार

कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचे काहीही साइड इफेक्ट समोर आलेले नाहीत. लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा म्हणून आम्हीच पहिल्यांदा ही लस घेण्याचा निर्णय टास्क फोर्समध्ये घेतला आहे. कोरोना ज्यांना झाला नाही किंवा ज्यांना होऊन गेला असेल त्यांनी लस घ्यायची आहे. कोरोना लस घेतल्याचा तुम्हाला फायदा होईल, मी सोमवारी सकाळी लस घेणार आहे, असं संजय ओक यांनी स्पष्ट केले.

मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचे

डॉ.संजय ओक यांनी सोशल मीडियावरुन पॉझिटिव्ह आणि चांगले मेसेज पाठवावेत.समाजापर्यंत पोहोचण्याची ताकद सोशल मीडियात आहे.जगात पुन्हा कोरोनाचा कहर सुरु झाला असताना भारतात कोरोना नियंत्रणात आणण्यामध्ये यशस्वी झालो. याच श्रेय जनतेचे आहे, असंही संजय ओक यांनी स्पष्ट केले. कोरोनावरील लस जरी आली असली तरी मास्क आणि सोशल डिस्टसिंग ठेवावे. लसीकरणाचा कार्यक्रम पुढे पुढे चालू राहील. आज दोन लसी आहेत. मे महिन्यापर्यंत भारतात 6 लसी उपलब्ध होतील.त्यावेळी जनतेला मोठ्या प्रमाणात लस देता येईल. 2021 मध्ये कोरोनावर निंयत्रण मिळवण्यात यश येईल, असं संजय ओक म्हणाले.

संबंधित बातम्या

राज्यभरात लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसं होतंय लसीकरण

Corona Vaccination : अदर पुनावालांनी टोचली लस, पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासार्हतेच्या मुद्द्याला पाठबळ

(Dr. Sanjay Oak said corona vaccination day is glorius and joyful for us)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...