Corona Caller Tune: कोरोनाच्या ‘कॉलर टय़ून’मुळे डोक्याला ताप; दररोज तीन कोटी तास वाया

वापरकर्त्यांला फोन त्वरित स्वीकारला जाणे अपेक्षित असताना नाहक ‘कॉलर टय़ून’ ऐकावी लागते. | Corona Caller Tune

Corona Caller Tune: कोरोनाच्या ‘कॉलर टय़ून’मुळे डोक्याला ताप; दररोज तीन कोटी तास वाया
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 7:36 AM

मुंबई: कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या मनावर स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगचा संदेश बिंबवण्यासाठी तयार करण्यात आलेली कॉलर ट्यून आता बहुतांश लोकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची बाब समोर आली आहे. या कॉलर ट्यूनमुळे (Coronavirus) दररोज तीन कोटी तास वाया जात असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. (Heavy Cost Of The Annoying Covid Caller Tune)

गेल्या काही महिन्यांपासून सर्व मोबाइल नेटवर्कवरून ही कॉलर ट्यून ऐकवली जाते. आपत्कालीन परिस्थितीत ही ‘कॉलर टय़ून’ त्रासदायक ठरते, कारण वापरकर्त्यांला फोन त्वरित स्वीकारला जाणे अपेक्षित असताना नाहक ‘कॉलर टय़ून’ ऐकावी लागते. त्यामुळे लोकांना दैनंदिन कामकाजात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भारतामध्ये दररोज सरासरी 300 कोटी कॉल केले जातात. या कॉलर ट्यूनमुळे लोकांच्या वाया जात असलेल्या वेळेची एकत्रित गोळाबेरीज केल्यास ३ कोटी तास इतकी होते.

महानायकाच्या आवाजातील कोरोना ‘कॉलर ट्यून’ बंद होणार

लवकरच मोबाईलवरील महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोना प्रतिबंधाची माहिती देणारी कॉलर ट्यून बंद करण्यात येणार आहे. या कॉलर ट्यूनऐवजी आता कोरोना लसीकरणाची धून ऐकू येणार आहे. देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याने, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ही ट्यून बदलण्यात येणार आहे.

कॉलर ट्यून बंद करण्यासाठी जनहित याचिका

ए. के. दुबे आणि पवन कुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या कॉलर ट्यून संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. ‘या कॉलर ट्यूनमुळे सगळेच ग्राहक त्रस्त असून, ही ट्यून लवकरात लवकर बंद करण्यात यावी, , असे या याचिकेत म्हटले होते.

‘ट्राय’च्या प्रमुखांचाच विरोध

‘ट्राय’चे अध्यक्ष पी. डी. वाघेला यांनीही कॉलर ट्यूनबाबत नापसंती दर्शविली आहे. करोना साथीशी संबंधित संदेशांची अनेकदा पुनरावृत्ती होते. परिणामी कालबाह्य़ कॉलर टय़ून हे त्रासाचे साधन बनले आहे. मोबाइल वापरकर्ते अशा संदेशांकडे मोठय़ा प्रमाणात दुर्लक्षही करतात. आता लोक सामाजिक अंतर नियम आणि मुखपट्टय़ांच्या वापरण्याबाबत पुरेशी जागरुकता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील नेत्यांचाही कॉलर ट्यूनवर आक्षेप

‘कोरोना’च्या जनजागृती संदर्भात लावलेली कॉलर ट्यून सतत ऐकून अनेक जण आता त्रस्त झाले आहेत, असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी केली होती. ‘कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाकडून गेली अनेक महिने कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही’, असे नांदगावकर यांनी म्हटले होते.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी कोरोना काळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेली कॉलर ट्यून बंद करावी, अशी मागणी केली होती.

(Heavy Cost Of The Annoying Covid Caller Tune)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.