आता कोलेस्ट्रॉलचे इतकं प्रमाणही धोक्याची घंटा, भारतीयांसाठीची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी
कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ( CSI ) ने डिस्लिपिडेमिया आजाराच्या ( शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल ) संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, भारतीयांच्या कोलेस्टेरॉलची पातळी काय असावी या संदर्भात नवीन पॅरामीटर जारीर केले आहेत.

कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने ( CSI ) डिस्लिपिडेमिया ( Dyslipidemia ) ( रक्तात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे ) आजारा संबंधी भारतीय नागरिकांच्या संदर्भातील स्वतंत्र मानके जारी केली आहेत. भारतीयांच्या शरीरात एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी या संदर्भात नवे ठोकताळे जारी झाले आहेत. एलडीएल-कोलेस्ट्रॉल ( बॅड कोलेस्ट्रॉल ) एचडीएल-कोलेस्ट्रॉल ( गुड कोलेस्ट्रॉल ) आणि ट्रायग्लिसराईड्सच्या पातळी संदर्भातील खास भारतीयांसाठीची मानके जारी केली आहेत. भारतात डिस्लिपिडेमिया या आजाराचे वाढते प्रमाण पाहून कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे.
डिस्लिपिडेमिया हा एक सायलेंट किलर आजार आहे, या आजाराची लक्षणे सहसा दिसत नाहीत. हा आजार शरीरात हळूहळू वाढत जातो आणि हृदयविकारासह इतर अनेक आजारांचा त्यामुळे धोका वाढतो असे कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे (CSI) अध्यक्ष डॉ. प्रताप चंद्र रथ यांनी म्हटले आहे. कोलेस्ट्रॉल ओळखण्यासाठी नागरिकांनी ल्युपिड प्रोफाइल टेस्ट करून घ्यावी असे कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉ. दुर्जती प्रसाद सिन्हा यांनी सांगितले. शरीरातील ल्युपिडची पातळी निश्चित करण्यासाठी आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. ही भारतासाठीची स्वतःची पहिली मार्गदर्शक तत्त्वे असल्याचे म्हटले जात आहे.
शरीरात किती कोलेस्ट्रॉलची लेव्हल हवी
सामान्य लोकांमध्ये एलडीएल-सीची ( बॅड कोलेस्ट्रॉल ) पातळी 100 mg/dLच्या खाली आणि नॉन-एचडीएल-सीची पातळी 130 mg/dLच्या खाली असायला हवी. उच्च जोखीमवाले व्यक्ती ज्यांना डायबिटीज वा उच्च रक्तदाब आहे. त्यांना एलडीएल-सीची पातळी 70 mg/dL हून खाली आणि आणि नॉन-एचडीएलची पातळी 100 mg/dLहून खाली राखण्याचे लक्ष्य ठेवले पाहीजे. त्याच्याहून कमी किंवा जादा पातळी असणे तब्येतीसाठी धोकादायक आहे.
ज्यांना हार्टअॅटॅक किंवा पक्षघात वा क्रोनिक किडनी आजाराचा पूर्व इतिहास आहे. अशा उच्च जोखीमवाल्या रुग्णांनी एलडीएल-सी पातळी 55 mg/dL हून खाली वा नॉन-एचडीएल पातळी 85 mg/dL हून खाली राखण्याचे लक्ष्य ठेवायला हवे असे नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. जे. पी. एस. साहनी यांनी म्हटले आहे.
कोलेस्ट्रॉल कंट्रोल कसे करावे –
जीवनशैलीतील बदल करणे, जसे की नियमित व्यायाम करणे, दारू आणि तंबाखू सोडणे आणि साखरेचे सेवन कमी करणे, हे महत्त्वाचे आहे. हृदयविकार, स्ट्रोक किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये स्टॅटिन, नॉन-स्टॅटिन औषधे आणि फिश ऑइल ( ईपीए ) ची शिफारस केली जाते. 500 mg/dL वरील ट्रायग्लिसराइड पातळीसाठी फेनोफायब्रेट, सॅग्लिटाझोअर आणि फिश ऑइल वापरणे आवश्यक आहे. या लोकांनी ही औषधे घ्यावीत असे डॉ. जे. पी. एस. साहनी यांनी सांगितले.