FSSAI : कॉटन कँडी ते चमचमीत बटर चिकन चवीने खाताय…कृत्रिम रंगाचे मायाजाल जाणून घ्या…
कर्नाटक राज्याने अन्नपदार्थांच्या गाडी आणि रेस्टॉरंटवर धाडी टाकल्यानंतर 260 नमूने गोळा केले होते. त्यातील 41 नमून्यात नकली रंग आणि कॅन्सरला आमंत्रण देणारे घटक सापडल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला ( FSSAI ) त्यांच्या तपासणीत कॅन्सर सारख्या आजारांना आमंत्रण देणारे घटक सापडले आहेत.

कर्नाटक राज्यात नुकतीच पाणी पुरी आणि इतर खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रस्त्यांवरील खाद्यपदार्थांसह चांगल्या पॉश रेस्टॉरंटमधील अनेक खाद्यपदार्थांचे नमूने तपासले गेले. त्यावेळी पाणीपुरीतील पाण्याला रंग देण्यासाठी कृत्रिम रंग वापरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच कॉटन कँडी लहान मुले आवडीने खातात या कॉटन कँडीसाठी देखील वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम रंगात चक्क रोडामीन – बी नामक घटक आढळला आहे या घटकामुळे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला आमंत्रण मिळत असल्याचे उघडकीस आले आहे. खाद्यपदार्थांमधील रासायनिक रंगांमुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. कर्नाटक सरकारने रोडामीन – बी नामक फूड कलरवर नुकतीच बंदी घातलेली आहे....
