AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आणि चीन एकत्र, जगात खळबळ, थेट या देशाला दिला मोठा इशारा, मित्रासाठी..

रशिया आणि युक्रेन युद्ध गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या युद्धाच्या झळा फक्त या दोन देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला बसताना दिसत आहेत. त्यामध्येच आता भारत आणि चीन एकत्र आल्याचे बघायला मिळतंय.

भारत आणि चीन एकत्र, जगात खळबळ, थेट या देशाला दिला मोठा इशारा, मित्रासाठी..
Vladimir Putin pm modi and Beijing
| Updated on: Dec 31, 2025 | 7:54 AM
Share

युक्रेन आणि रशिया युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. मात्र, युक्रेनच्या एका चुकीची हिंमत अख्ख्या जगाला मोजावी लागू शकते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर थेट युक्रेनने ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पुतिन यांच्या घरावर 91 ड्रोन सोडून त्यांना झोपेतच मारण्याचा कट युक्रेनचा होता. यादरम्यान रशियाच्या लष्कराने हा हल्ला उधळून लावला. मात्र, युक्रेनने केलेल्या या कृत्याचा प्रचंड संताप रशियामध्ये बघायला मिळतोय. रशियाने थेट सांगितले की, युक्रेनला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. पुतिन यांची झोपेतच हत्या करण्याचा कट युक्रेनने रचल्यानंतर लगेचच रशियाच्या लष्कराची महत्वाची बैठक पार पडली. युक्रेनवर हल्ला करू नये, याकरिता मोठा दबाव नक्कीच रशियावर आहे. मात्र, थेट पुतिन यांच्या घरावर 91 ड्रोन सोडून युक्रेनने चूक केली असून हे युद्ध अधिक भडकण्याची दाट शक्यता आहे. आता युक्रेनचे अध्यक्ष रशियाच्या हल्ल्यापासून कसे वाचतात हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भारत आणि चीन हे दोन्ही देश रशियाच्या अत्यंत जवळचे आहेत. पुतिन यांच्या घरावर ड्रोन हल्ला झाल्याचे कळताच दोन्ही देश पुतिन यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर तीव्र चिंता व्यक्त केली. कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला लक्ष्य करणे ही एक अत्यंत गंभीर बाब आहे, असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

चीनने पुतिन यांच्यावर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, आपण सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहोत. सध्याच्या परिस्थितीत तणाव वाढवणारी कोणतीही कृती टाळणे महत्त्वाचे आहे. बीजिंगने हे स्पष्ट केले की, राजनैतिक प्रयत्न हाच शांततेचा एकमेव मार्ग आहे आणि कोणत्याही प्रकारचा हल्ला प्रादेशिक यासोबतच जागतिक अस्थिरता वाढवू शकतो.

युक्रेनने केलेल्या कृत्यामुळे हे युद्ध अधिक भडकण्याची शक्यता असल्याचे संपूर्ण जगाचे म्हणणे आहे. रशिया कोणत्याही परिस्थितीमध्ये या हल्ल्याला उत्तर देणार हे स्पष्ट आहे. हेच नाही तर अमेरिकेने देखील युक्रेनने केलेल कृत्य म्हणजे पागलपण असल्याचे म्हटले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी या हल्ल्यानंतर लगेचच पुतिन यांना फोन केला. रशियाने या काळात शांत राहवे असे सांगितले जातंय.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.