Maharashtra Election News LIVE : अंबरनाथ शहरात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून रस्ता रोको
Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. आता राज्यात अनेक भागात मोठे राजकीय नेते मंडळी प्रचारसभा घेताना दिसतील.

राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक जिल्ह्यांमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळाले. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागेल. प्रचार शिगेला पोहोचला असून काही ठिकाणी युती म्हणून राजकीय पक्ष निवडणुका लढवत आहेत तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे. प्रशासकीय राजनंतर लोकप्रतिनिधींच्या हातात पालिकांचे कारभार जाणार आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मैदानात एकत्र उतरल्याने या निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले. एबी फॉर्म मिळवण्यासाठी अनेकांची काल धडपड बघायला मिळाली. आता जोरदार प्रचारसभांचे आयोजन केले जाईल. यासह राज्यातील, देशविदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
अंबरनाथ शहरात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून रस्ता रोको
अंबरनाथ शहरात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सिग्नल यंत्रणा तातडीने लावावी यासाठी आमदार बालाजी किणीकर यांनी ठेकेदाराला दम दिला आहे. किती दिवसात काम होणार लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे असा इशारा ठेकेदाराला देण्यात आला आहे.
-
अंबरनाथ तालुक्यात बिबट्याची दहशत, बदलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक
गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. या बिबट्याला पकडण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरले आहे. याचाच निषेध म्हणून बदलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी चक्क वनाधिकाऱ्यांना बिबट्याची प्रतिकृतीच भेट दिली. बिबट्याला पकडण्याची शूरताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे राहिलेली नाही. आता माणसांचा जीव गेल्यानंतरच तुम्ही बिबट्याला पकडणार का? असा संतप्त सवालही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलाय.
-
-
नवे पोलीस महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती
महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नवे डीजीपी म्हणून नियुक्ती केली आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयात दहशतवादी अजमल कसाबचा थेट सामना करणारे धाडसी अधिकारी म्हणून सदानंद दाते यांची ओळख आहे.
-
सुनील तटकरे हे रायगडचे आका, महेंद्र थोरवेंचा आरोप
सुनील तटकरे हे रायगडचे आका असल्याची टीका महेंद्र थोरवे यांनी केली आहे. काळोखेंच्या हत्येनंतर महेंद्र थोरवेंनी तटकरेंवर गंभीर आरोप केला आहे. तर थोरवेंना तटकरे कुटुंबियांशिवाय दिसत नाही असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.
-
मुंबईत वॉर्ड 211 आणि 212 मध्ये कमळ, धनुष्यबाण चिन्ह दिसणार नाही
मुंबई वॉर्ड 211 आणि 212 मध्ये यंदा कमळ आणि धनुष्यबाण चिन्ह दिसणार नाही. या दोन ठिकाणी महायुतीचे उमेदवार दिसणार नाहीत. या दोन्ही वॉर्डात एबी फॉर्म दिल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
-
-
मुंबईत सत्ताधारी आमदाराच्या मतदारसंघात 99 टक्के विकासनिधी, तर विरोधकांना डावललं
मुंबईत सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99 टक्के विकासनिधी दिला जात आहे. तर विरोधकांना एकही टक्का निधी नाही, अशी इंग्रजी दैनिकाची माहिती आहे. ऑक्टोबरपर्यंत मिळालेला निधी सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात वितरीत झाला आहे. 1 हजार 67 कोटी रुपये सर्वाधिक वाटा भाजपाच्या आमदारांना मिळाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांना 372 कोटी रुपये निधी मिळाला आहे.
-
निवडणूक: नवी मुंबईतही भाजपने खाते उघडले
नवी मुंबईतही भाजपने आपले खाते उघडले आहे . पनवेल महानगरपालिकेत भाजप नगरसेवक बिनविरोध निवडून आले . नितीन पाटील बिनविरोध निवडून आले .
-
शिर्डी : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सज्ज झाली आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि साईभक्तांचे दर्शन सुकर व्हावे यासाठी शिर्डीत अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. साईमंदिर परिसरातील नगर-मनमाड महामार्ग नो – व्हेइकल झोन करण्यात आला असून वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.
-
अंबरनाथ : शहरात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे शिवसेनेकडून रास्ता रोको
अंबरनाथ शहरात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सिग्नल यंत्रणा तातडीने लावावे यासाठी आमदार बालाजी किणीकर यांनी ठेकेदाराला दम दिला. किती दिवसात काम होणार? लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे असं ठेकेदाराला सांगण्यात आले आहे.
-
चंद्रपूर : पोलिसांनी देशात सुरू असलेलं किडनी रॅकेट उघडकीस आणलं
चंद्रपूर पोलिसांनी देशात सुरू असलेलं किडनी रॅकेट उघडकीस आणलं आहे. तमिळनाडूच्या त्रिची येथे किडनी काढण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याआधी सावकारी जाचाला कंटाळून किडनी विकणारा शेतकरी रोशन कुडे या प्रकरणात मोहाली येथून हिमांशू भारद्वाज या आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी हिमांशू भारद्वाज याची देखील किडनी काढण्यात आल्याचं वैद्यकीय तपासणीत समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी हिमांशू भारद्वाज यांने किडनी नेमकी कुठे विकली याचा तपास केला. तामिळनाडूच्या त्रिची येथे किडनी काढण्यात आल्याचे समोर आले आहे.
-
पुणे : बिबट्या पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात कुत्रा झाला जेरबंद
कोरेगाव भीमा येथे साजऱ्या होत असलेल्या शौर्य दिनावर बिबट्याच्या संकटाचे सावट असल्याने या भागात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले आहेत. मात्र वन विभागाने बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात पेरणे परिसरात चक्क कुत्राच जेरबंद झालाय, त्यामुळे हा विषय सध्या या भागात चर्चेचा झाला आहे.
-
ठाकरे गटातील उमेदवारांचे अर्ज बाद करण्यासाठी भाजपकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र
ठाकरे गटातील उमेदवारांचे अर्ज बाद करण्यासाठी भाजपकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र
उमेदवारांच्या बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्याची करण्यात आली मागणी
निवडणूक नियमावलीनुसार मूळ स्वाक्षरी असणे आवश्यक असल्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात उल्लेख
निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने ठाकरे गटाचे अर्ज बाद करण्यात यावे अशी पत्राद्वारे करण्यात आली मागणी
भाजपचे पंचवटी मंडल अध्यक्ष राहुल कुलकर्णी यांच्याकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले पत्र
-
संभाजीनगर नंतर अमरावतीतही भाजप कार्यकर्त्यांमध्ये उफळला नाराजीचा उद्रेक
संभाजीनगर नंतर अमरावतीतही भाजप कार्यकर्त्यांमध्ये उफळला नाराजीचा उद्रेक
भाजपच्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी नाकारल्याने उमेदवारी प्रक्रिया सहभागी असलेल्या पदाधिकाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी घेरलं
भाजपचे नेते जयंत डेहणकर ,दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी यांच्यासमोर कार्यकर्त्यांचा आक्रोश
इच्छुकांमध्ये मोठी नाराजी
-
कल्याण डोंबिवलीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध
कल्याण डोंबिवलीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध
कल्याण पूर्व येथील 18 मधून रेखा चौधरी, डोंबिवली पॅनल क्रमांक 26 क मधून आसावरी नवरे आणि 26 ब मधून रंजना पेणकर विजयी
भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
कल्याण, डोंबिवलीमध्ये भाजपला मोठं यश
-
मालेगावात इस्लाम पार्टीने खाते उघडले आहे.
मालेगावात इस्लाम पार्टीने खाते उघडले आहे.
प्रभाग क्रमांक 06 (क) मधून इस्लाम पार्टीच्या मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांची बिनविरोध निवड.
समोरच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांचा बिनविरोध विजय झाला.
मालेगावात इस्लाम पार्टीचा हा पहिलाच बिनविरोध विजय ठरला आहे.
या विजयानंतर इस्लाम पार्टीचे अध्यक्ष, माजी आमदार आसिफ शेख यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
-
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांविरोधात याचिका दाखल
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना मुख्य आरोपी करावं या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना मुख्य आरोपी म्हणून गुन्ह्यात सामील करण्यात यावं, तसंच केंद्रीय अन्वेषण विभाग किंवा सक्तवसुली संचलनालय यांच्याकडून न्यायालयीन देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे.
-
वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यातील सेलू (मुरपाड) शिवारात वाघाचा आढळला मृतदेह
वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यातील सेलू (मुरपाड) शिवारात वाघाचा मृतदेह आढळला. वाघ मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या वाघाच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवालात कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. वनविभागाकडून घटनेचा तपास सुरू आहे.
-
मुख्यमंत्री फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन
मुख्यमंत्री फडणवीसांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलंय. रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून दोन्ही उमेदवारांशी संवाद साधला. पनवेलमधून भाजपचे नितीन पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. निकालाआधीच भाजपचे 4 उमेदवार विजयी ठरले.
-
वर्षाच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार नाहीत उपस्थित
वर्षाच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती ठीक नसल्याने शिंदे त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानीच आराम करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. २९ पैकी ११ ठिकाणीच महायुती झाल्याने शिवसेनेचील नेते नाराज असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे बैठकीला न पोहोचल्याने चर्चांना उधाण आलंय.
-
सोलापुरात अर्ज छाननीदरम्यान पोलीस आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची
सोलापुरात अर्ज छाननीदरम्यान पोलीस आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. अर्ज छाननीसाठी सूचक, अनुमोदन वगळता केवळ उमेदवाराला आत सोडत असल्याने पोलिसांसोबत पदाधिकाऱ्यांची बाचाबाची झाली. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
-
धुळे महानगरपालिका निवडणूक; भाजपने उघडलं पहिलं खातं
धुळे महानगरपालिका निवडणुकी भाजपने पहिलं खातं उघडलं आहे. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील भाजपाच्या उमेदवार उज्वला रणजीत राजे भोसले बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रतिस्पर्धी विरोधातले उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने उज्वला भोसले बिनविरोध निवडून आल्या आहेत. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून भाजपात प्रवेश केला होता.
-
महानगरपालिकेसाठी महायुतीचा मास्टर प्लान
11, 12 आणि 13 जानेवारीला मुंबई, नवी मुंबई , बोरीवली आणि ठाणे – मिराभांईंदर या ठिकाणी महायूतीच्या मोठ्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत अमित शाह, आणि भाजपच्या इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती असणार… अशी माहिकी सुत्रांनी दिली आहे.
-
छत्रपती संभाजीनगर : प्रभाग क्रमांक दोन मधून प्रशांत भदाने यांना तिकीट नाकारल्याने समर्थक आक्रमक
प्रभाग क्रमांक दोन मधून प्रशांत भदाने यांना तिकीट नाकारल्याने समर्थक आक्रमक झाले आहेत. भागवत कराड व इथल्या मंत्र्यांनी भाजप बुडवायला काढली अशा समर्थकांनी आरोप केला आहे. ज्या व्यक्तींना आम्ही ओळखत नाही त्यांना तिकीट देण्यात आलं आहे… असं वक्तव्य प्रशांत भदाणे पाटील यांच्या समर्थकांनी केलं आहे.
-
मंत्री भरत गोगावले यांनी तुळजापूर मध्ये धरला गाण्यावर ठेका
धाराशिव-राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी तुळजापूर मध्ये जलदिंडीच्या कार्यक्रमात गाण्यावर ठेका धरत डान्स केला. तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र मोहत्सव सुरू असून आज त्या मोहत्सवातील प्रमुख जलदिंडी उत्सव आहे.
-
शिवतीर्थावर कुर्ला येथील नाराज मनसे सैनिक राज ठाकरे यांच्या भेटीला
शिवतीर्थावर कुर्ला येथील नाराज मनसे सैनिक राज ठाकरे यांच्या भेटीला आले. कुर्ला येथील वार्ड क्रमांक 166 मधील नाराज मनसे सैनिक राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ वर दाखल झाले आहेत. स्थनिक शिसेना आमदार संजय पोतनीस यांनी हस्तक्षेप करून मनसेची जागा शिवसेनाला घेतल्याचा मनसे पद अधिकाऱ्यांचा आरोप आहे.
-
छत्रपती संभाजीनगर – भाजप कार्यालयात नाराजी उफाळली, भागवत कराड यांचा निषेध
छत्रपती संभाजीनगर येथे भाजप कार्यालयात नाराजी उफाळली असून भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घालत त्यांचा निषेध करण्यात आला. अतुल सावे यांच्या गाडीलाही घेराव घालण्यात आला असून पदाधिकारी प्रचंड आक्रमक झालेत.
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत विजयी उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-महायुतीच्या विजयाला शुभारंभ. प्रभाग क्र. 18 मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्र. 26-क मधून आसावरी केदार नवरे यांचा नगरसेविका पदी बिनविरोध विजय झाला. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे दोन्ही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले….
-
संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला
संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. संजय राऊत हे शिवतीर्थ येथे दाखल झाले असून ते राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
-
नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी सज्ज, साईमंदिर रात्रभर उघडे राहणार
सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीची साईनगरी भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. आपल्या लाडक्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी देशभरातील विविध शहरांतून अनेक पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. भाविकांचा हा वाढता ओघ लक्षात घेता, साईबाबा संस्थान प्रशासनाने आज साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
अहिल्यानगर मनपा निवडणुकीचा धुराळा: महायुतीत बिघाडी, भाजप-अजित पवार गट एकत्र
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ६८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा न सुटल्याने अखेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ५४ जागांसह स्वतंत्र रिंगणात उतरली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने मात्र एकीचे बळ दाखवत शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांसोबत मिळून जागावाटप पूर्ण केले आहे. ६८ जागांच्या या रणसंग्रामात आता त्रिकोणी लढत स्पष्ट झाली असून कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
-
काय चुकले माझे? तिकीट नाकारताच भाजपच्या माजी नगरसेवकाची पोस्ट
भाजपचे माजी नगरसेवक किरण दराडे यांची एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. “काय चुकले असे की, भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी नाकारली?” अशा भावनिक आशयाचे पोस्टर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. विशेष म्हणजे, या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोच्या अगदी शेजारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे घड्याळ हे चिन्ह लावण्यात आले आहे. भाजपतून उमेदवारी नाकारली गेल्याने नाराज झालेल्या दराडे यांनी कालच राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला आहे.
-
वसई-विरार मनपाचा रणसंग्राम: ११५ जागांसाठी ९४७ उमेदवारांचे अर्ज दाखल
वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकूण ११५ जागांसाठी ९४७ उमेदवारांनी ९४९ अर्ज दाखल केले आहेत. २९ प्रभागांमधील या ११५ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत आज सकाळी ११ वाजल्यापासून अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. तांत्रिक कारणांमुळे कोणाचे अर्ज बाद होतात आणि कोणाचे अर्ज वैध ठरतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे डोळे लागले आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत सत्ताधारी बहुजन विकास आघाडी (बविआ) आणि महायुती यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार असून, या थेट लढतीमुळे वसई-विरारचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
-
मुंबईत ठिकठिकाणी भरारी पथके तैनात, गिरगाव चौपाटीवर पोलिसांची करडी नजर
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल होताच राज्य निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर आला आहे. निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर, सोन्याची तस्करी आणि मतदारांना दिल्या जाणाऱ्या प्रलोभनांना आळा घालण्यासाठी मुंबईतील प्रमुख मोक्याच्या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके (SST) तैनात करण्यात आली आहेत. विशेषतः गिरगाव चौपाटी परिसरात पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. दर दोन किलोमीटर अंतरावर ही पथके सज्ज आहेत. संशयास्पद हालचाली किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळल्यास कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत वाढलेला हा कडेकोट बंदोबस्त सध्या सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून प्रशासनाने आचारसंहितेच्या पालनासाठी कंबर कसली आहे.
-
नाशिक मनपा निवडणुकीत ऐतिहासिक घडामोड, प्रकाश लोंढे कारागृहातून लढवणार निवडणूक
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना समोर आली आहे. सातपूर गोळीबार प्रकरणात गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेले रिपाइं (आठवले गट) माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आता थेट तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत. न्यायालयाच्या विशेष निर्देशानुसार त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सातपूर प्रभाग क्रमांक ११ मधून दाखल केला आहे. नाशिक महापालिकेच्या इतिहासात कारागृहातून निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या घडामोडीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
उमेदवारी न मिळाल्याने अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक नाराज
उमेदवारी न मिळाल्याने अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक नाराज. तीस वर्षापासून घरात लावलेले अशोकराव चव्हाण यांचे फोटो टाकले काढून. नांदेड महानगरपालिकेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून दाखल केला उमेदवारी अर्ज. आता घरात, कार्यालयात लावणार बाळासाहेब ठाकरे व एकनाथ शिंदे यांचे फोटो
-
सध्या मुंबईला वाचवणं ही प्राथमिकता – सचिन अहिर
“मुंबईचा महापौर हिंदी भाषिक करण्याची भाजपची चिथावणी. ठाकरे बंधू एकत्र का आले? ते सांगण्याचं काम आम्ही केलय. सध्या मुंबईला वाचवणं ही प्राथमिकता. मुंबईची जनता बघतेय. त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही” असं सचिन अहिर म्हणाले.
-
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव भाजपाच्या वाटेवर
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव भाजपाच्या वाटेवर. वसमत विधानसभेचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव भाजपाच्या वाटेवर. आतिश जयप्रकाश दांडेगावकर भाजपा मध्ये पक्षप्रवेश करणार का?. कपीश्वर शुगर्स अँड केमिकल्स लिमिटेडचे आतिश जयप्रकाश दांडेगावकर अध्यक्ष आहेत.
-
वर्षाच्या शेवटच्या दिवशीही मुंबईची हवा खराब
वर्षाच्या शेवटच्या दिवशीही देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हवेची गुणवत्ता खराब आहे. शासकीय APP वर हवा गुणवत्ता निर्देशांक 133 च्या वर दाखवला जातोय तर इतर APP वर हा 265 च्या घरात पोहोचलेला दिसतोय. बीकेसी आणि बांद्रा इथे एक्यूआय 175 पर्यंत पोहोचलाय.
-
सुरेश वरपूडकर यांच्यावर गंभीर आरोप
परभणीत भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. शिवसेनेकडून भाजप नेते माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्यामुळे युती होऊ शकली नाही, वरपूडकर यांनी घर गाड्यांसाठी युती तोडली असा थेट आरोप शिवसेनेकडून करण्यात आला,
-
लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघड
12,900 हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून ऊघड. या योजनेतून वगळण्यात आलेले असतानाही 12,915 सरकारी कर्मचारी दरमहा 1,500 रुपयांचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. या नव्या आकडेवारीनंतर योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे.
-
6 जानेवारीला होणार उपाध्यक्षांची निवड, नगराध्यक्षांनी बोलविली सभा..
गोंदिया स्थानिक नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला तर 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडली. यात नगराध्यक्षपदी सचिन शेंडे हे निवडून आले. गॅजेटमध्ये त्यांचे नाव आल्यानंतर आता त्यांनी 16 जानेवारीला नगर परिषदेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची सभा न.प.च्या सभागृहात बोलविली आहे.
-
1 जानेवारीपासून नवीन रेल्वे वेळापत्रक लागू
यानुसार काही रेल्वेंच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने जनशताब्दी एक्स्प्रेस, हिंगोली- मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस यासह अनेक रेल्वेंच्या येण्याच्या आणि जाण्याच्या वेळांत बदल झाला आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या चौकशी प्रणाली, रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ, स्टेशन चौकशी कार्यालय किंवा स्टेशन मास्टर यांच्याकडून नवीन वेळापत्रकाची माहिती घ्यावी.
-
महायुती तुटल्यानंतर तीन तासांत भाजपने 96 उमेदवारांना दिले एबी फॉर्म
महायुती तुटल्यानंतर तीन तासांत भाजपने 96 उमेदवारांना एबी फॉर्म म्हणजेच पक्षाच्या चिन्हावर अधिकृतरीत्या लढण्याची मुभा असलेले पत्र दिले. एकूण 50 माजी नगरसेवकांना भाजपने मैदानात उतरविले आहे. त्यात उबाठा व इतर पक्षांतून आलेल्या 13 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर 46 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. 19 ठिकाणी भाजपला उमेदवार मिळाले नाहीत तर मनपाच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार भाजपने उतरविले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये चुरसीची लढत
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत विविध पक्ष आणि अपक्षांनी 29 प्रभागात 115 जागेसाठी दिवसभरात शहरातील नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत एक हजार आठशे सत्तर उमेदवारी अर्ज दाखल केले, आज दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. त्रुटी आढळल्यास उमेदवारी अर्ज बाद होतो का..? अशी धाक धुक आता उमेदवारांना पडली आहे.
-
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस अलर्ट मोडवर
सांगली पोलिसांकडून 31 डिसेंबर आणि सांगली महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून स्वतः नाकाबंदीची तपासणी करण्यात येत आहे. शहरात ठीक ठिकाणी सांगली पोलीस दलाकडून नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
Published On - Dec 31,2025 8:07 AM
