Ayushman Bharat Yojana: Ayushman Card : 5 लाखांपर्यंत मोफत उपचार… आयुष्यमान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात?

प्रत्येक पात्र कुटुंबाला कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. तथापि, या कार्डमध्ये कोणत्या आजारांचा समावेश आहे, असा प्रश्न लोकांना अनेकदा पडतो. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Ayushman Bharat Yojana: Ayushman Card : 5 लाखांपर्यंत मोफत उपचार... आयुष्यमान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात?
| Updated on: Nov 17, 2026 | 3:57 PM

Ayushman Bharat Yojana Treatment Limit: केंद्र सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएम-जेएवाय) देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना आणि पात्र कुटुंबांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक पात्र कुटुंबाला कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. तथापि, या कार्डमध्ये कोणत्या आजारांचा समावेश आहे, असा प्रश्न लोकांना अनेकदा पडतो. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

आयुष्मान कार्डद्वारे या प्रमुख आजारांवर होतात  उपचार!

Loading...
  • अनेक गंभीर हृदयविकार, बायपास शस्त्रक्रिया आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांवर सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये उपचार केले जाऊ शकतात.
  • कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या पर्यायांचा या योजनेत समावेश आहे.
  • किडनी फेल्युअर, डायलिसिस आणि किडनीच्या इतर गंभीर समस्यांवरही या योजनेअंतर्गत मोफत उपचार उपलब्ध आहेत.
  • सांधे बदलणे आणि हाडांच्या गंभीर दुखापती व शस्त्रक्रिया पॅकेजेसदेखील उपलब्ध आहेत.
  • या योजनेअंतर्गत पोट, डोळे, कान, नाक आणि घशाशी संबंधित सर्व सामान्य आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

कुठे मिळेल उपचार?

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य आयुष्मान कार्डधारक असाल आणि तुम्हाला आरोग्याची समस्या असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधू शकता. तुमच्या आजारासाठीचे पॅकेज तिथे सक्रिय आहे की नाही, याची खात्री रुग्णालय करू शकते. कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारींसाठी, तुम्ही राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक 1800-1800-4444 वर संपर्क साधू शकता.

दरम्यान, आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा संरक्षणाची सुविधा दिली जाते. आयुष्मान कार्डची एका वर्षाची  मर्यादा ५ लाख रुपये आहे. म्हणजेच, दरवर्षी या कार्डच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंतच तुम्ही मोफत उपचार घेता येतात.  य उपचारांचा खर्च सरकारकडून केला जातो. मात्र, हे कार्ड सर्वच रुग्णालयांमध्ये चालत नाही. या योजनेत नोंदणीकृत असलेल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्येच या सुविधेचा लाभ घेता येतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us