AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Actor : एकावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप अन् परिस्थिती बिकट; दुसरा लग्नात डान्स करून करतोय उदरनिर्वाह, दोन प्रसिद्ध अभिनेत्यांची झालीये अशी अवस्था

Bollywood Actor : बॉलिवूडच्या दोन अभिनेत्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

Bollywood Actor : एकावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप अन् परिस्थिती बिकट; दुसरा लग्नात डान्स करून करतोय उदरनिर्वाह, दोन प्रसिद्ध अभिनेत्यांची झालीये अशी अवस्था
| Updated on: Nov 17, 2026 | 3:40 PM
Share

बॉलिवूडमध्ये एकेकाळी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अनेक कलाकार आज प्रसिद्धीपासून दूर आहेत. एकेकाळी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारे अभिनेते आज आर्थिक आणि आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत आहेत. अभिनेता राहुल रॉय आणि शरद कपूर यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.

राहुल रॉयचा आजारपणानंतरचा संघर्ष

1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ या चित्रपटामुळे राहुल रॉय रातोरात स्टार झाले. या चित्रपटानं त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर ‘जुनून’, ‘फिर तेरी कहानी याद आई’ यांसारख्या चित्रपटांतून त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, कालांतरानं त्याला चित्रपटसृष्टीत अपेक्षित काम मिळेनासं झालं. 2020 मध्ये कारगिलमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग करत असताना राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक आला. या आजारामुळे त्याच्या बोलण्यावर परिणाम झाला. पुन्हा व्यवस्थित चालता-बोलता येईल की नाही, याचीही त्याला खात्री नव्हती. आजारपणातून सावरल्यानंतर काम मिळवणं त्याच्यासाठी मोठं आव्हान ठरलं. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी लग्नसमारंभांमध्ये नृत्याचे कार्यक्रम स्वीकारण्यासही सुरुवात केली. अशा कार्यक्रमांमधून तो दोन ते चार लाख रुपये कमवत असल्याचं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘माझेही खर्च आहेत आणि मला पैशांची गरज आहे. लोक माझी खिल्ली उडवतात, पण हे देखील मेहनतीचं काम आहे,’ असं राहुलनं सांगितलेलं.

शरद कपूरची आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थिती बिकट

दुसरीकडे, अभिनेता शरद कपूरलाही सध्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ‘दस्तक’, ‘जोश’, ‘लक्ष्य’ आणि ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यानं आपल्या अभिनयाची छाप पाडली. विशेषतः शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या ‘जोश’ चित्रपटातील ग्रोव्हरच्या भूमिकेमुळे तो चर्चेत आला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याची कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्य अनेक अडचणींनी वेढलं गेलं. शरदनं नुकत्याच एका व्हिडिओमार्फत आपली आर्थिक आणि मानसिक परिस्थिती सांगितली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आपण अंथरुणाला खिळून असल्याचं त्यानं म्हटलं आहे. पायाला झालेली दुखापत आणि आरोग्यविषयक समस्यांमुळे त्याला काम करणं शक्य झालं नाही.

2024 मध्ये त्याच्याविरोधात लैंगिक गैरवर्तनाची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणामुळे आपण डिप्रेशन गेलो होतो आणि कोणालाही भेटण्याची किंवा काम करण्याची इच्छा उरली नव्हती, असं त्यानं सांगितलं. आता मात्र पुन्हा काम करण्याची इच्छा असल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे. ‘मला आर्थिक, मानसिक आणि भावनिक आधाराची गरज आहे. मला काम करायचं आहे. आर्थिक अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी मला संधी द्या,’ असं आवाहन त्यानं चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांना केलं.

शरद कपूरनं मदतीसाठी आवाहन केल्यानंतर अभिनेता सोनू सूदनं अभिनेत्याला मदतीचा हात पुढे केला. त्याच्या पायाच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची मदत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सोनू सूदनं केली आहे. तसंच त्याला पुन्हा काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही दिलं आहे.

Follow Us
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?
प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा
Rohit Pawar : प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा कोणाला अप्रत्यक्ष टोला
माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस..
Pradeep Purnekar : माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस ठाण्याबाहेर बॅनरबाजी; तपासावर प्रश्नचिन्ह
महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का?
Dipali Sayyad On Rupali Chakankar : महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का? दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांना सवाल
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी...
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी होती, कारण...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ